पालिकेची मोहीम : थकबाकीदारांमध्ये घबराटवरुड : नगरपरिषदअंतर्गत येणाऱ्या मालमत्ता थकीत कराच्या वसुलीकरिता पालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. सर्वाधिक थकबाकीदारांची मालमत्ता करापोटी घरगुती तसेच सुखवस्तूची जप्ती करून तिघांची बुधवारी शहरात वसुली करण्यात आली. या मोहिमेमुळे थकबाकीदारामध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. नगरपरिषदअंतर्गत असणाऱ्या स्थावर मालमत्तेचा लाखो रुपयांचा कर थकीत असताना वांरवार सूचना तसेच प्रसिद्धीला देऊनही थकबाकीचा भरणा करण्यात आला नाही. यामुळे ेवृत्तपत्र प्रसिद्धीला शहरातील ५१ मालमत्ता कर थकबाकीदारांची यादी प्रकाशित करून कराचा भरणा करण्याकरिता तीन दिवसांची मुदत देण्यात आली होती. परंतु केवळ चार लोकांनी थकीत कराचा भरणा केला. उर्वरित लोकांनी प्रतिसाद दिला नसल्याने अखेर मुख्याधिकारी प्रकाश राठोड यांनी २९ मार्चला सकाळपासून सर्वाधिक थकीत कर असणाऱ्या मालमत्ताधारकापासून सुरुवात केली. यामध्ये श्रीधर दयाराम सोमकुंवर रा.आनंद कॉलनी वॉर्ड नं १ यांचेकडे १४ लाख ४३ हजार ७३७ रुपये थकित कराची रक्कम असल्याने घरातील टी.व्ही., फ्रिज, कार, दुचाकी, पलंग सोफासेट, खुर्ची, कुलर, संगणक, एल.सी.डी जप्तीची कारवाई केली. दुसरे थकबाकीदार हरिहर वरुडकर यांची तीन प्रकारची मालमत्ता असून १५ लाख ६१ हजार ३९४ रुपये थकीत कर आहे. यामध्ये सोफा, टी.व्ही., फ्रिज, खुर्ची, सायकल, पलंग, तसेच इतर साहित्य जप्त करण्यता आले. मालमत्ता कर थकबाकीदारांची जप्तीची कारवाई नियमित राहणार असून घरगुती वस्तू जप्तीची धडक मोहीम राबविल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. जप्ती मोहिमेत पालिकेचे प्रमोद सोंडे, प्रतीक वाटाणे, लिलाधर टिक्कस, संकेत माटे, दिलीप आमलेसह पालिका कर्मचारी सहभागी होते. (तालुका प्रतिनिधी)
कर वसुलीसाठी तिघांची मालमत्ता जप्त
By admin | Updated: March 31, 2017 00:18 IST