शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ तीन पॉझिटिव्ह हाथीपुऱ्यातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : येथील हाथीपुरा परिसरातील मृत कोविड-१९ पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील २४ नागरिकांना कोविड रुग्णालयात शनिवारपासून क्वारंटाइन ...

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : बाधितांची संख्या चार, समूह संक्रमणाचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील हाथीपुरा परिसरातील मृत कोविड-१९ पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील २४ नागरिकांना कोविड रुग्णालयात शनिवारपासून क्वारंटाइन करण्यात आले आहे. यापैकी तिघांचे थ्रोट स्वॅब मंगळवारी उशिरा पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण बाधितांची संख्या चार झालेली आहे. त्यामुळे या भागात समूह संक्रमणाची भीती निर्माण झाली आहे.हाथीपुरा भागातील ४५ वर्षीय व्यक्तीचा ३ एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या व्यक्तीचा थ्रोट स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने या परिसरातील तीन किमी परिसर बफर झोन घोषित करण्यात येऊन बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना कोविड रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आले व या सर्वांचे नमुने तपासणीसाठी नागपूरच्या ‘एम्स’ प्रयोगशाळेत शनिवारी पाठविण्यात आले. यापैकी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने क्वारंटाइन असलेल्या या बाधितांना आता पॉझिटिव्हसाठी असलेल्या कक्षात हलविण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.अहवालानंतर महापालिका व जिल्हा प्रशासनाद्वारे या भागात युद्धस्तर उपाययोजना राबविण्यात येणार आहे. महापालिकाद्वारे या भागातील हाथीपुरा, कांगारपुरा, सौदागरपुरा, तालाबपुरा, नागपुरी गेट, मौलापुरा, बोहरा गल्ली व सुफीयाननगर हे भाग कन्टोनमेन्ट घोषित केले आहे. येथे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहेत.मृत कोरोनाग्रस्ताच्या हिस्ट्रीविषयी संभ्रममृत ४५ वर्षीय वाहकाच्या ट्रॅव्हल हिस्ट्रीविषयी आरोग्य व पोलीस यंत्रणेला अद्यापही निश्चितपणे सांगता येत नाही. सध्या पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आरोग्य तपासणी तातडीने होणे महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर आता या भागात समूह संक्रमणाची भीती निर्माण झाली आहे.पॉझिटिव्ह तिघेही एकाच कुटुंबातीलकोविड पॉझिटिव्ह आलेले तिघेही बाधित मृत कोरोनाग्रस्ताच्या कुटुंबातील आहेत. यामध्ये एक महिला व दोन पुरुष असल्याची माहिती आहे. या मृताच्या संपर्कातील २४ व्यक्तींचे थ्रोट स्वॅब नागपूरला तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी १४ नमुने निगेटिव्ह, ३ पॉझिटिव्ह आहेत, तर ७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. मृताचा स्वॅब घेणाºया डॉक्टरांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे.मृत बाधित व्यक्तींच्या संपर्कातील २४ व्यक्ती कोविड रुग्णालयात क्वारंटाईन आहेत. त्यापैकी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सोमवारी रात्री दगावलेल्या व्यक्तीचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे.- शैलेश नवालजिल्हाधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या