शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

धामणगाव रेल्वेत पुन्हा तीन पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:01 IST

शहरातील धवणेवाडी, आंबेडकरनगर परिसरातील रहिवासी आणि नागपूर येथे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला असलेल्या २१ वर्षीय युवती १२ दिवसांच्या वैद्यकीय उपचारादरम्यान सोमवारी सकाळी ती सावंगी मेघे येथील रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह आढळली. तिच्यासोबत सावंगी मेघे येथेच दवाखान्यात असलेल्या दोन बहिणी व आईला आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले होते.

ठळक मुद्देआंबेडकरनगर हॉटस्पॉट : तीन जणांचे घेणार थ्रोट स्वॅब

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : शहरातील २१ वर्षीय युवती सोमवारी कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर सदर युवतीच्या आई व दोन बहिणींचा अहवाल मंगळवारी उशिरा रात्री पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्यामुळे धवणेवाडी, आंबेडकरनगर हा परिसर नवीन हॉटस्पॉट घोषित करण्यात आला आहे.शहरातील धवणेवाडी, आंबेडकरनगर परिसरातील रहिवासी आणि नागपूर येथे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला असलेल्या २१ वर्षीय युवती १२ दिवसांच्या वैद्यकीय उपचारादरम्यान सोमवारी सकाळी ती सावंगी मेघे येथील रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह आढळली. तिच्यासोबत सावंगी मेघे येथेच दवाखान्यात असलेल्या दोन बहिणी व आईला आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले होते. त्यांचा अहवाल मंगळवारी रात्री पॉझिटिव्ह आला, तर वडिलांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती वर्धा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी दिली.सदर युवतीचे काका, काकू व चुलतभाऊ यांना परसोडी रस्त्यावरील कोविड सेंटरमध्ये आयसोलेशन करण्यात आले. थ्रोट स्वॅब घेण्यासाठी त्यांना अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या तपासणी केंद्रात नेले असून, तेथे क्वारंटाइन केल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश साबळे यांनी सांगितले. सदर युवतीची आई शहरातील तीन घरी घरकाम करीत असे. या तिन्ही कुटुंबांचे गृह विलगीकरण केले आहे. धवणेवाडी परिसर हे शहरातील भाजीपाला विक्रीचे केंद्र आहेत. याशिवाय येथून अनेक वाटा शहरातील वस्त्यांमध्ये जात असल्याने शुक्रवारपर्यंत घोषित जनता कर्फ्यूदरम्यान या परिसरातून ये-जा करण्यास निर्बंध घालण्यात आला.दरम्यान, जळगाव आर्वी येथे मुंबईहून आलेल्या पारधी बांधवांच्या आरोग्याची काळजी आरोग्य प्रशासन घेत आहे. ज्या एकाच कुटुंबातील चार सदस्य कोरोना बाधित आहे, ते कुटुंब ३ मेपासून धामणगाव शहरात नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे तहसील प्रशासनाने कळविले आहे.शहरातील इतर कोणत्याही भागात कोरोना संशयित रुग्ण नाहीत. शहरवासीयांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवा पसरणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल.- भगवान कांबळे, तहसीलदार, धामणगाव रेल्वे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या