शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबारप्रकरणी आणखी तिघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 01:06 IST

अलहिलाल कॉलनीत झालेल्या गोळीबार प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी आणखी तीन आरोपींना सोमवारी पहाटे अटक केली. शेख इस्माईल शेख उस्मान (५३), शेख इरफान शेख इस्माईल (२०) व राजू ऊर्फ शेख रिहान शेख इस्माईल (२२ सर्व रा. हबीबनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

ठळक मुद्देदेशी कट्टा जप्त : गाडगेनगर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अलहिलाल कॉलनीत झालेल्या गोळीबार प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी आणखी तीन आरोपींना सोमवारी पहाटे अटक केली. शेख इस्माईल शेख उस्मान (५३), शेख इरफान शेख इस्माईल (२०) व राजू ऊर्फ शेख रिहान शेख इस्माईल (२२ सर्व रा. हबीबनगर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून एक देशी कट्टा जप्त केला.जुन्या वैमनस्यातून दोन गटांत उफाळून आलेल्या वादानंतर शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास गोळीबार झाला. यामध्ये अन्सार शाह जमील शाह (२८, रा. अलहिलाल कॉलनी) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर राजीक ऊर्फ राजा शाह युसूफ शाह (३५), शाकीर शाह बसीर शाह (३२) आणि नौशाद शाह मुस्ताक शाह (२८, सर्व रा. हबीबनगर) जखमी झाले. याप्रकरणात पोलिसांनी रविवारी दुपारी मुख्य आरोपी शेख मन्नान, त्याचा मुलगा शेख सलमान व शेख हन्नान या तिघांना अटक केली.याप्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली होती. त्यापैकी गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय पवार यांच्या पथकाने तीन आरोपींना आष्टीवरून अटक केली. शेख इस्माईलच्या आष्टीतील सासरच्या घरी आरोपींनी आश्रय घेतला होता. आता या प्रकरणातील अन्य एका पसार आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.पोलिसांनी सहा आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करून दहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जुन्या वैमनस्यात समझोता करण्यासाठी गेलेलो असताना अचावक गोळीबार झाल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली आहे.संपत्तीची चौकशी करागोळीबार प्रकरणातील आरोपी शेख मन्नान हा गुन्हेगार आहे. त्याचा ट्रकचोरीचा व्यवसाय आहे. तो पूर्वी कटला चालवित होता. आता त्याने मोठी संपत्ती गोळा केली आहे. त्याच्या संपत्तीची तसेच ती मिळविताना वापरलेल्या मार्गांची चौकशी व्हावी, अशी मागणी सोमवारी आयोजित पत्रपरिषदेतून मृत व जखमींच्या समर्थकांनी केली आहे. यावेळी नगरसेविका हफीजाबी यांचा मुलगा फिरोज शाह युसूफ शाह, शेख नईम शेख करीम, अब्दुल शारीक अब्दुल मजिद, शेख आबीद, मोहम्मद जिया व मो. अकबर उपस्थित होते. शनिवारी रात्री अन्सारचे समर्थक मन्नानच्या घरी गेले होते. त्यांनी अचानक हल्ला चढविला. आम्ही निशस्त्र गेले होतो, असा खुलासा अन्सार समर्थकांनी केला.