शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

परतवाड्यात तीन लाखांचे अवैध सागवान पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 05:01 IST

लाकूडफाट्यासह अन्य सागवान लाकडांबाबत दस्तावेज आढळून न आल्यामुळे सर्व लाकूड वनविभागाने परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन परिसरात जमा केले. ट्रॅक्टरच्या चार व शासकीय वाहनाच्या दोन खेपा करुन हे लाकूड परिसरात पोहचविले गेले. या लाकडासोबत इतर अवजारेही वनविभागाने ताब्यात घेतली आहेत. याप्रकरणी भारतीय वनअधिनियम १९२७ कलम २६ (१), ४१, ४२, महाराष्ट्र वननियमावली नियम ३१,४७ अन्वये वनविभागाने गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देमालवाहू वाहन जप्त : वनविभागाची कारवाई, फर्निचर मार्टमध्ये छापा

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : स्थानिक एन.ए. फर्निचर मार्टमधून परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी तीन लाखांचे अवैध सागवान पकडले. मालवाहू वाहनदेखील जप्त करण्यात आले आहे.पंचमुखी मंदिरापुढील तारानगर परिसरातून ११ ऑगस्टला सकाळी हे अवैध सागवान जप्त केले गेले. चालक सुमीत वाडवे व फर्निचर मार्टचा संचालक राजा खान महमूद खान यांना ताब्यात घेण्यात आले. एमएच २७ एक्स १३९३ या चारचाकी वाहनामध्ये अवैध सागवान लाकूड एन.ए. फर्निचर मार्ट येथे उतरविण्यात आल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाल्यावरुन ही धाड टाकली गेली. या लाकूडफाट्यासह अन्य सागवान लाकडांबाबत दस्तावेज आढळून न आल्यामुळे सर्व लाकूड वनविभागाने परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन परिसरात जमा केले. ट्रॅक्टरच्या चार व शासकीय वाहनाच्या दोन खेपा करुन हे लाकूड परिसरात पोहचविले गेले. या लाकडासोबत इतर अवजारेही वनविभागाने ताब्यात घेतली आहेत. याप्रकरणी भारतीय वनअधिनियम १९२७ कलम २६ (१), ४१, ४२, महाराष्ट्र वननियमावली नियम ३१,४७ अन्वये वनविभागाने गुन्हा दाखल करण्यात आला.अमरावती प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे, दक्षता पथकाचे विभागीय वनअधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे, सहायक वनसंरक्षक ज्योती पवार यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड, वनपाल डी.सी. लोखंडे, ए.एन. ठाकरे, के.डी. काळे, वनरक्षक नितीन अहिरराव, प्रवीण निर्मळ, प्रशांत उमक, राजेश गायकी, पी.के. वाटाणे, रूपाली येवले, शिवम बछले, जगन पालीयाड, व्ही.जे. तायडे, अमोल निमकर, पूजा वानखडे, प्रवीणा निमकर, वाहनचालक सूरज भांबूरकर, पोलीस कॉन्स्टेबल ए.आर. धर्माळे यांनी ही कारवाई पूर्णत्वास नेली.

टॅग्स :forest departmentवनविभागArrestअटक