शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

तीन लाख शेतकरी कर्जमुक्त

By admin | Updated: June 13, 2017 00:01 IST

शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर केली, याचा जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

शेतकरी आंदोलनाचे यश : पाच एकरांवरील दीड लाख खातेदार प्रतीक्षेतलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर केली, याचा जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मात्र कमाल भूधारकांसाठी तत्त्वत: मान्यता दिली आहे. कर्जमाफीविषयीचे निकष समिती ठरविणार असल्याने महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. या सर्व खातेदारांना आजपासूनच कर्ज वाटपाचे आदेश शासनाने दिल्याने आता कर्ज वाटपाचा टक्का वाढणार आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे हे फलित होय.शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा यासह इतर मागण्यांसाठी राज्यात उसळलेल्या शेतकरी आंदोलनाच्या उद्रेकामुळे अखेर शासनाने नमते घेतले व अल्प भूधारकांना रविवारी कर्जमाफी दिली. या सर्व शेतकऱ्यांना सोमवारपासून कर्ज देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मात्र जिल्ह्यातील बँकांनी अद्याप थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज दिलेले नाही. घोषणा जरी शासनाने केली असली तरी प्रत्यक्षात बँकांना याविषयीचे आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे एक, दोन दिवसांत बँकांव्दारा कर्जवाटप सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी मंगळवारी कर्ज वाटपविषयक सर्व यंत्रणांची बैठक बोल्यावली आहे. यामध्ये शासनाचे सूचना देण्यात आल्यानंतर खऱ्या अर्थाने पीककर्ज वाटपाचा वेग वाढणार आहे. जिल्ह्यात पाच एकरांच्या आतील ३ लाख ८ हजार ४६४ शेतकरी खातेदार आहेत. पैकी किमान अडीच लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा थेट लाभ होणार आहे. संयुक्त समितीच्या निर्णयाची प्रतीक्षाअमरावती : जिल्ह्यात एक लाख ६३ हजार ३११ शेतकऱ्यांकडे पाच एकराच्या वर शेती आहे. यापैकी ६ एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना अल्पभूधारक शेतकऱ्यांप्रमाणे कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे. मात्र उर्वरित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला शासनाने तत्वत: मंजुरी दिली आहे. मात्र यासाठी निकष काय असावेत यासाठी सुकाणू समिती व शासनाचे सदस्य यांची संयुक्त समितीमध्ये बैठका होतील. त्यानंतर हा मुद्दा निकाली निघणार आहे. तोवर दीड लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.जिल्ह्यात ३.३३ लाख शेतकरी कर्जदारजिल्ह्यात ४.१५ लाख शेतकरी खातेदार आहेत. यापैकी तीन लाख ३३ हजार १९७ शेतकरी कर्जदार आहेत. यामध्ये जिल्हा बँकेचे ३६,८३३, राष्टीयीकृत बँकेचे २,३८,०२१ व ग्रामीण बँकेचे १,९८४ शेतकरी कर्जदार आहेत. अद्याप ६५,२७८ शेतकऱ्यांनी कर्जाचा लाभ घेतला नाही तर १,७५७ शेतकरी खातेदारच नाहीत. मागील वर्षी १,६५,७७१ शेतकऱ्यांनी बँकाचे कर्ज घेतले आहे. जिल्ह्यात १,६७,४२६ शेतकरी विवीध बँकांचे थकबाकीदार आहेत. यामध्ये जिल्हा बँकेचे ३६,८८३, राष्टीयकृत बँकेचे १,३१,००१, तर ग्रामीण बँकेचे ५०२ शेतकरी थकबाकीदार आहेतयंदा १,३५४ कोटींचे कर्जवाटप बाकीयंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकाना १,५९२ कोटी ५४ लाखांचे पीककर्ज वाटपाचे लक्ष्यांक आहे त्या तुलनेत सद्यस्थितीत बँकांनी १,३५४ कोटी ५२ लाक रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. यामध्ये राष्टीयीकृत बँकांना १,५०,५५४ शेतकऱ्यांना १,०६२,कोटी ६ लाख रुपयांचे लक्ष्यांक असताना आतापर्यंत ६,०३९ शेतकऱ्यांना ६९.४८ कोटी, जिल्हा बँकेला ८८,९७० शेतकऱ्यांना ५१६.६० कोटी कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना आतापर्यंत १७,६४२ शेतकऱ्यांना १६५ कोटी, १८ लाखांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण बँकेला १३ कोटी ८८ लाख रूपयांचे लक्ष्यांक असताना १९३ शेतकऱ्यांना एक कोटी ८२ लाख रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. मंगळवारच्या बैठकीत ठरणार दिशाराज्य शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी रविवारी घोषित केल्यानंतर सोमवारपासून शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचे आदेश दिले. मात्र बँकांची स्थिती जैसे थै आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी मंगळवारी कर्जवाटप विषयक घटकांची आढावा बैठक बोलाविली आहे. या बैठकीनंतरच जिल्ह्यातील कर्जवाटपाचा वेग वाढणार आहे.