शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
2
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
3
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
5
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
6
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
7
म्युच्युअल फंडातील 'हे' शुल्क खातात तुमची कमाई; खर्च कमी करण्यासाठी काय करायचं?
8
देशातील परिस्थितीवर आलिया भटची इतक्या दिवसांनी पोस्ट; म्हणाली, "प्रत्येक वर्दीच्या मागे..."
9
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
10
गुन्हेगार अन् पीडितला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
11
कधीच न पाहिलेला फोटो शेअर करत दिग्दर्शकाची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाला...
12
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
13
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
14
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
15
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
16
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
17
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
18
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
19
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
20
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट

तीन ग्रामपंचायतीत लक्षावधींची अफरातफर

By admin | Updated: May 15, 2016 23:57 IST

जिल्ह्यातील पोहरा, पिंपळखुटा आणि नांदगाव पेठ या तीन ग्रामपंचायतींमध्ये लाखो रूपयांची अफरातफर करण्यात आली आहे.

ग्रामसेवकांसह पाच जणांविरुध्द गुन्हे : पोहरा, पिंपळखुटा, नांदगाव पेठ येथील प्रकारअमरावती : जिल्ह्यातील पोहरा, पिंपळखुटा आणि नांदगाव पेठ या तीन ग्रामपंचायतींमध्ये लाखो रूपयांची अफरातफर करण्यात आली आहे. याप्रकरणी फ्रेजरपुरा आणि नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात ग्रामसेवकासह अन्य चार जणांविरुध्द भादंविच्या कलम ४०९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी अमरावती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जितेंद्र हरिभाऊ देशमुख यांनी तक्रार नोंदविली आहे. अमरावती तालुक्यातील पोहरा आणि पिंपळखुटा या दोन ग्रामपंचायतींमध्ये एस.आर.खानंदे हे २००४ ते २००६ या कालावधीत ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. या कार्यकाळात त्यांनी निधीची अफरातफर केल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्यांनी केलेल्या प्राथमिक चौकशी व अहवालानंतर गटविकास अधिकारी जितेंद्र देशमुख यांनी खानंदे यांच्याविरुध्द फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोहरा ग्रामपंचायतीमधील १२ हजार १४ रुपये आणि पिंपळखुटा येथील १० हजार ४९४ अशा एकूण २२ हजार ६४० रूपयांच्या निधीची खानंदे यांनी अफरातफर केल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. नांदगाव पेठ ग्रामपंचायतीमध्ये अपहारपोहरा आणि पिंपळखुटा ग्रामपंचायतीप्रमाणेच अमरावती तालुक्यातील नांदगाव पेठ ग्रामपंचायतीमध्ये निधीची मोठी अफरातफर करण्यात आली आहे. आर.डब्ल्यू.लिखिल, एस.पी. देशमुख,एच.एम. उताणे आणि एस.एस.सगणे या चौघांनी ग्रामपंचायत निधीची अफरातफर केली. सन १९९७ ते २०१० या कालावधीत कार्यरत उपरोक्त चार ग्रामसेवकांनी हा आर्थिक अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. लेखा परीक्षणाच्या खास अहवालानुसार खर्चाच्या रक्कमेमध्ये त्रुटी आढळून आल्यानंतर प्राथमिक चौकशीत मोठ्या निधीची अफरातफर झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून चौघांविरुध्द नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.