आॅनलाईन लोकमतचांदूर बाजार : तालुक्यातील करजगाव येथील एका शेतकºयांच्या शेतातील संत्रा झाडे विजेच्या स्पार्किंगमुळे जळाल्याची तक्रार शेतकºयाने केली आहे. यामुळे त्यांचे नुकसान झाले. याची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.करजगाव येथील शेतकरी कमलाकर बाजीराव ढाकुलकर यांचे खरपी शेतशिवारात ३७६ व ३७७ अशा दोन शेतातील सव्वातीन एकरांत ५३० संत्रा झाडे आहेत. त्यांच्या शेतातून आसपासच्या शेतात चारही दिशेन वीजपुरवठा करण्यासाठी पोल उभारले आहेत. कित्येक वर्षांपासून या खांबांची दुरुस्ती झालेली नसल्याने विजेचे तार लोंबकळले आहेत. यात स्पार्किंग होऊन आगीचे लोळ खाली पडल्याने संत्रा झाडे होरपळली. त्यांच्या बगीच्यातील बहुतांश झाडांची अशीच स्थिती आहे.झाडे जळाल्याची तक्रार त्यांनी तलाठी, करजगाव कनिष्ठ अभियंता कार्यालय व परतवाडा सबस्टेशला केली आहे. तलाठ्यांनी पंचनामा केला आहे. महावितरणच्या कर्मचाºयांनी पाहणी केली आहे. मात्र, अद्याप नुकसान भरपाईसंदर्भात सांगण्यात आले नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
तीन एकरांतील संत्रा झाडे जळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 23:36 IST
तालुक्यातील करजगाव येथील एका शेतकºयांच्या शेतातील संत्रा झाडे विजेच्या स्पार्किंगमुळे जळाल्याची तक्रार शेतकºयाने केली आहे. यामुळे त्यांचे नुकसान झाले.
तीन एकरांतील संत्रा झाडे जळाली
ठळक मुद्देखरपी शिवारातील घटना : नुकसान भरपाईची मागणी