शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील अनेक प्रकल्प तहानलेले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 15:21 IST

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस चांगला असला व आजच्या तारखेपर्यंत धरणात जास्त पाणीसाठा असला तरी २४ आॅगस्टपर्यंत सरासरी ७५ टक्क््यांपेक्षा जास्त पाणीसाठा राहायला हवा होता. पण, पश्चिम विदर्भातील ४९९ प्रकल्पांची सरासरी ५८.०२ टक्के आहे.

ठळक मुद्दे४९९ प्रकल्पात ५८.०२ टक्के पाणीसाठाबुलडाण्याची स्थिती बिकट

संदीप मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस चांगला असला व आजच्या तारखेपर्यंत धरणात जास्त पाणीसाठा असला तरी २४ आॅगस्टपर्यंत सरासरी ७५ टक्क््यांपेक्षा जास्त पाणीसाठा राहायला हवा होता. पण, पश्चिम विदर्भातील ४९९ प्रकल्पांची सरासरी ५८.०२ टक्के आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प पावसाच्या प्रतीक्षेत असून, तेथील १०५ प्रकल्पांमध्ये फक्त १३.६९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने चिंता वाढली आहे.विभागातील पाचही जिल्ह्यांतील मोठे, मध्यम व लघू असे एकूण ४९९ प्रकल्पांतील संकल्पित पाणीसाठा हा ३२८३.६३ दलघमी आहे. आजचा पाणीसाठा हा १९०५.०९ दलघमी आहे. शेकडो प्रकल्पांच्या पाणीसाठ्याची स्थिती ही बिकट आहे. उन्हाळयात अनेक जिल्ह्यात पाणीटंचाईची झड पोहचू शकते.२४ आॅगस्टपर्यंत अमरावती जिल्ह्यामधील ८४ प्रकल्पांमध्ये ४८.९० टक्के पाणीसाठा आहे. सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस न पडल्यास जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही. मागील वर्षी ४१.१६ टक्के होता. यामध्ये अप्पर वर्धामधून अमरावती शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. या प्रकल्पात फक्त ४६.८८ टक्के पाणीसाठा आहे. दोन आठवड्यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने व नद्यांना पूरसुद्धा आल्याने जिल्ह्यातील ११८ प्रकल्पात ८०.२६ टक्के प्रकल्प भरले आहेत. मागील वर्षी बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला २७.८४ टक्केच पाणीसाठा शिल्लक होता. यंदा जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये ७५.३७ टक्के पाणीसाठा आहे.अकोला जिल्ह्यातील ४६ प्रकल्पात ६६.६५ टक्के भरले आहेत. मागील वर्षी २०.९२ टक्के पाणीसाठा होता. येथील दोन मोठ्या प्रकल्पांची स्थिती यंदा चांगली आहे. मात्र, मध्यम प्रकल्प ५८ टक्के भरले आहेत.वाशिम जिल्ह्यातील १४६ प्रकल्पाची टक्केवारी ७१.४६ टक्के आहे. मागील वर्षी फक्त १५.६५ टक्के होती. बुलडाणा जिल्ह्याची यंदा स्थिती फारच खराब असून, १०५ प्रकल्पांमध्ये सरासरी १३.६९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. येथील तीन मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त ८.९७ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षीसुद्धा हीच परिस्थिती होती. १६.८४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.बुलडाण्यातील मध्यम प्रकल्पांची स्थिती गंभीरबुलडाणा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये असलेल्या मध्यम प्रकल्पांचीही स्थिती गंभीर असून, सात मध्यम प्रकल्पांमध्ये १८.४७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांची स्थिती चांगली असून, सद्यस्थितीत चार मध्यम प्रकल्पांमध्ये ६०.९८ टक्के पाणीसाठा आहे. अकोल्यात चार प्रकल्पांमध्ये ५८.४८ टक्के, तर वाशिममध्ये तीन प्रकल्पांत ९१.१४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.जिल्हा प्रकल्प पाणीसाठा सरासरी टक्केवारीअमरावती ८४- ४८.९०यवतमाळ ११८- ८०.२६अकोला ४६- ६६.६५वाशिम १४६ - ७१.४६बुलढाणा १०५ - १३.६९एकूण ४९९- ५८.०२महिन्याभरात चांगला पावसाची प्रतीक्षा आहे. काही प्रकल्प अपेक्षित नियोजनानुसार भरले नाहीत, तर आॅक्टोबरमध्ये आढावा घेऊन अनेक जिल्ह्यांत प्रकल्पांमधील पाणीसाठा पिण्यासाठी राखून ठेवला जाईल.- रवींद्र लांडेकर, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग

टॅग्स :water shortageपाणीटंचाई