लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : बाजार यंदा कापसाचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे दरवाढीच्या आशेने कापूस घरात साठवून ठेवल्याने आता अंगाला खाज सुटली आहे. यंदा अतिवृष्टी, बोंडअळी, नापिकीच्या धसक्याने कापूस उत्पादक शेतकरी हादरला होता. शेकडो हेक्टर पिके नेस्तनाबूत झाली. त्यामुळे कापसाच्या शेतीला उत्पादनात मोठ्याप्रमाणावर घट झाली. अतिवृष्टीच्या तावडीतून वाचलेली कपाशी कशीबशी सावरली. महागडी कीटकनाशके, रासायनिक खते, मजुरांची टंचाई यातून सावरलेल्या पिकांना शेतकऱ्यांना सध्या कवडीमोल भावाने कापूस विकावा लागत आहे. फेब्रुवारी मध्यावर असतानाही भाव ७१५० रुपयांवर स्थिरावला आहे. याभावात शेतकरी परवडत नसल्याने माल घरातच साठवला असल्याने शेतकरी अडचणीत आले आहे.
सीसीआयने आखडला हातहमीभावाने जिल्ह्यातील नऊ केंद्रांवर कापसाची खरेदी करण्यात येत आहे. यामध्ये कधी केंद्र बंद तर बहुतेकवेळी खरेदीची मंदगती असते. सीसीआयच्या या पावित्र्याने कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे.
"निसर्गाची अवकृपा शासनाचे धोरण शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहे. इतर पिकांपेक्षा कापूस पिकावर खर्च जास्त होत असल्याने कापूस या भावात परवडत नाही नाइलाजाने विकल्याशिवाय पर्याय नाही."- राजाभाऊ गुडधे, शेतीनिष्ठ शेतकरी, अमडापूर (राजुरा बाजार), ता. वरूड
"यंदा कपाशीचे उत्पादन कमी आहे. दरवाढ होईल या अपेक्षेने घरातच साठवून ठेवला आहे. भाव मात्र अत्यल्प आहे. खासगी बाजारपेठेत ७००० ते ७१५० रुपये दर असल्याने साठवणूक केली आहे."- शिवहरी गोमकाळे, शेतकरी, राजुरा बाजार
"कापसाचे दर रुई, सरकीवर अवलंबून आहे. पुढील महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर माल बाजारात येईल."- राजेश गांधी, कापूस व्यापारी, वरूड