शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

शेकडोंना फसवून ठगबाज पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 00:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हरियाणातील जैन धर्माच्या संस्थांकडून वाहन कर्ज उपलब्ध करून देणाचे आमीष दाखवून कनकराज जैन नामक तरुणाने अमरावतीतील शेकडो जणांची लाखो रुपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला. याची तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पोलिसांनी कनकराज जैनविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.मागील सहा महिन्यांपासून वसंत टॉकीजजवळील ...

ठळक मुद्देकोतवालीत गुन्हा दाखल : सेवाभावी संस्थेकडून वाहन कर्ज देण्याचे आमिष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हरियाणातील जैन धर्माच्या संस्थांकडून वाहन कर्ज उपलब्ध करून देणाचे आमीष दाखवून कनकराज जैन नामक तरुणाने अमरावतीतील शेकडो जणांची लाखो रुपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला. याची तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पोलिसांनी कनकराज जैनविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.मागील सहा महिन्यांपासून वसंत टॉकीजजवळील इंद्रपुरी लॉजमध्ये राहून कनकराज जैन याने भाजीबाजारातील जैन मंदिरात ये-जा करीत होता. दरम्यान त्याने तेथील स्वच्छता कर्मचारी सुधिर उकेसोबत ओळख केली. त्याच्या माध्यमातून त्याने मंदिरात येणाºया नागरिकांशी परिचय करून घेतला.अहिंसेच्या नावे फसवणूकत्याने तेथील नागरिकांना हरियाणा येथील जैन सेवाभावी संस्थेतून गरजू व्यक्तींना आर्थिक मदत देण्याचे आमिष दाखविले. अंहिसा आर्थिक योजनेतून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने सर्वप्रथम पुजारींना २० हजारात दुचाकी वाहने देऊन विश्वासात घेतले. त्यामुळे पुजाºयानेही कनरराजने सांगितलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेकांना आमंत्रण दिले. त्यानुसार अनेक जण कनकराजसोबत जुळायला लागले. २ हजार २०० रुपये भरले की २ लाखांचे कर्ज, ५ हजार भरले की ५ लाखांचे कर्ज तसेच वाहन हवे असेल तर २० हजार रुपये भरा आणि दुचाकी घ्या इतकेच नव्हे तर ८० हजार रुपये भरून ट्रॅक्टर देण्याचे आमिष कनकराज जैन याने नागरिकांना दाखविले. त्यानुसार अनेकांनी कनकराजजवळ पैसे जमा करण्यास सुरुवात केली. त्यानुसार काही जणांना वाहन सुध्दा दिले. मात्र, ज्यांना पैसे भरूनही वाहने मिळाली नाहीत, त्यांना कनकराजने रेल्वेस्थानक रोडवरील एका दुचाकीच्या शोरूममध्ये सुध्दा नेले. त्या ठिकाणी दुचाकी बुकिंग केल्याचे सांगून फोटोसेशन सुध्दा केले. हा प्रकार सुरु असताना कनकराजने याने थोडा वेळ थांबण्याचे सांगून तेथून पळ काढला.नागरिकांनी कनकराजची काही वेळ प्रतीक्षा केली. मात्र, तो परत आला नसल्याचे पाहून आपली फसवणूक झाल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे १५ ते २० नागरिकांनी इंद्रपुरी हॉटेलमध्ये जाऊन कनकराजचा शोध घेतला. त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला. परंतु, त्याचेशी संपर्क होऊ शकला नाही. या प्रकाराची तक्रार पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याकडे करण्यात आली. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार कोतवाली पोलिसांनी कनकराजविरुध्द फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. या फसवणूक प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.