शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत उभारणार एक हजार विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह, विष्णू सावरा यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 19:19 IST

आदिवासी मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण घेता यावे, यासाठी अमरावतीत एक हजार विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह उभारणार, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी शनिवारी येथे दिली.

चिखलदरा (अमरावती) : आदिवासी मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण घेता यावे, यासाठी अमरावतीत एक हजार विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह उभारणार, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी शनिवारी येथे दिली.    चिखलदरा येथे आदिवासी मुलांच्या वसतिगृहाच्या उद्घाटनासाठी आले असता  ना. सावरा यांनी ही घोषणा केली. यावेळी विशेष अतिथी म्हणून अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ, आ. प्रभुदास भिलावेकर, नगराध्यक्ष विजया सोमवंशी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी आदिवासी विकास विभाग अमरावतीचे अपर आयुक्त गिरीश सरोदे, धारणीचे प्रकल्प अधिकारी राहुल कर्डिले, सहायक प्रकल्प अधिकारी शिवानंद पेढेकर, निवासी नायब तहसीलदार सैफन नदाफ आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ना. सावरा म्हणाले, आदिवासी विकास मंत्रालयाचे बजेट तीन कोटींचे आहे. याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. यापूर्वीही बराच निधी आदिवासीच्या विकासासाठी खर्च झाला. परंतु विकास पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही. १९७२ साली आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळाची निर्मिती झाली. तेव्हापासून शिक्षणाप्रती जागृती निर्माण झाली. राज्यात सध्या ४८१ आश्रमशाळा आहेत. तरीही आश्रमशाळा कमी पडत आहेत. मुलांना प्रवेश मिळत नाहीत. त्यामुळे आता स्वंयसेवी संस्थांच्या माध्यमातून आश्रमशाळा, वसतिगृहे संचालित केली जातात. आदिवासी विकास विभागाच्या राज्यात १२५ शाळा असून, आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी (डीबीटी) हा कायदा आणला. या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होईल आणि त्यातून ते पुस्तक, वह्या, कपडे, साबण खरेदी करतील व त्यांना वेळेवर आवश्यक साहित्य खरेदी करता येईल. आदिवासी मुलांनाही इतर मुलांच्या स्पर्धेत टिकता यावे, यासाठी नामांकित शाळेत प्रवेश मिळण्याची व्यवस्था केली. पेसा कायदा, वनहक्क कायदा यासह अनेक कायदे तयार करून आदिवासी बांधवांच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी आ. प्रभुदास भिलावेकर म्हणाले, आम्ही वसतिगृहाची मागणी केली आणि ना. सावरा यांनी ती मागणी मान्य केली. हिवरखेड ते धारणी वीज जोडणीसाठी दोन कोटींचा निधी दिल्याचेही त्यांनी सांगितले. खासदार आनंदराव अडसूळ यांनी मेळघाटात आदिवासी बांधवांच्या विकासासाठी बºयाच योजना आणल्या. नुकताच खादी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून हनी क्लस्टरच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना हनिच्या पेट्याचे वाटप केल्याचे त्यांनी नमूद केले.