कोरोना संसर्ग टाळण्याकरिता मध्यप्रदेश सीमेवर कसून चौकशी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:11 AM2021-04-15T04:11:52+5:302021-04-15T04:11:52+5:30
पान २ लीड फोटो येत आहे. वरूड : कोरोना संसर्ग महाराष्ट्रात, विशेषत: अमरावती जिल्ह्यात झपाट्याने वाढला आहे. जिल्ह्याची ...
पान २ लीड
फोटो येत आहे.
वरूड : कोरोना संसर्ग महाराष्ट्रात, विशेषत: अमरावती जिल्ह्यात झपाट्याने वाढला आहे. जिल्ह्याची राष्ट्रीय पातळीवर नोंद घेतली गेली. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने वरूड तालुक्याशी भिडलेल्या सीमा सील केल्या आहेत. तपासणी नाक्यांवर कसून तपासणीशिवाय मध्य प्रदेशात प्रवेश मिळत नाही. मध्य प्रदेशातून मात्र दररोज वरुडात शेकडो नागरिक उपचाराकरिता विनातपासणी दाखल होत आहेत.
अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या हजारांचा घरात आहे. यामुळे महाराष्ट्रातील लोकांना मध्य प्रदेशात प्रवेशबंदी आहे. मध्य प्रदेशात गोनापूर (मुलताई) आणि करवार (पांढुर्णा) येथे तपासणी नाके आहेत. येथे कोरोणा चाचणी प्रमाणपत्र मागितले जाते. त्याशिवाय येथून प्रवेश दिला जात नाही. मात्र, मध्यप्रदेशातून येणारे प्रवाशी रुग्णाची कोणीही तपासणी करीत नाही. यामुळे कोरोणा विषाणूचा धोका वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
---------------
धारणीकरांनाही फटका
कोरोनाचा उद्रेक वाढल्याने मध्य प्रदेश शासनाने धारणीकरांनाही त्यांच्या राज्यात विनासायास प्रवेशास मज्जाव केला आहे. राज्य सीमेवरील तपासणी नाक्यांवर कोरोना तपासणी प्रमाणपत्र मागविले जात आहे. जिल्ह्यात नवीन वर्षाच्या १०० दिवसांत ३१५ व्यक्ती कोरोना संक्रमित होऊन दगावल्या, तर कोरोनाग्रस्तांचा आकडा ५० हजारांच्या पुढे गेला आहे.
---------------
प्रवासी वाहने बंद, ऑटोरिक्षांची कमाई वाढली
आंतरराज्य सीमेवर प्रवासी वाहने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे ऑटोरिक्षांचा सुळसुळाट झाला आहे. मध्यप्रदेशात पट्टण, मुलताई, आठनेर, बैतुलला जाणाऱ्या प्रवाशांना यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. वरूड ते पट्टण या २२ किमी प्रवासासाठी दोनशे रुपयांपर्यंत मोजावे लागतात.
-------------