अमरावती : पावसाच्या १२० दिवसांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचा परिणाम आता जाणवू लागला असून लहान प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. अनेक गावांतील जलस्त्रोतांनी तळ गाठला असल्याने पाणीटंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यातील २०१ गावांना पाणीटंचाईची झळ जाणवत आहे. जिल्हा प्रशासनाव्दारा ९५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ७ टँंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सद्यस्थिती चिखलदरा तालुक्यामधील ढोमणीफाटा व खडीमल गावात प्रत्येकी एक टँकर व चांदूररेल्वे तालुक्यामधील घुईखेड येथे ४ असे ७ टँकरनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील २०१ गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवत आहे. यामध्ये सर्वाधिक ४८ गावे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आहेत. अमरावती ३२, भातकुली १२, तिवसा ९, मोर्शी ८, वरुड ८, चांदूररेल्वे २१, धामणगाव रेल्वे २५, अचलपूर २८, चांदूरबाजार ३, अंजनगाव सुर्जी ५, दर्यापूर १, धारणी ८ व चिखलदरा तालुक्यांतील १३ गावे आहेत. जिल्ह्यात ९५ विहिरींचे अधिग्रहण एप्रिल ते जून २०१५ या कालावधीत करण्यात येणार आहे. यामध्ये २४ विहिरी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आहेत. अमरावती १७, भातकुली १, तिवसा ८, मोर्शी ४, वरुड १५, चांदूररेल्वे १९, धामणगाव रेल्वे ५, चांदूरबाजार १ व चिखलदरा तालुक्यात १ विहीर अधिग्रहित करण्यात येणार आहे. यावर ३२ लाख ७७ हजार निधीची तरतूद आहे. (प्रतिनिधी)४४ नळयोजनांची विशेष दुरुस्तीपाणीटंचाईच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यात ४४ नळयोजनांची विशेष दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ७ योजना, नांदगाव ८, भातकुली ८, तिवसा २, मोर्शी ४, वरुड ३, चांदूररेल्वे २, धामणगाव रेल्वे १, अचलपूर ३, चांदूरबाजार १ व अंजनगाव सुर्जी तालुक्यात ५ योजना आहेत. यावर २ कोटी ५९ हजार निधीची तरतूद आहे. १११ नवीन विंधन विहिरीपाणीटंचाई कृती आराखड्याच्या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यात १११ नवीन विंधन विहीर व कुपनलिका तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वाधिक ३१ नांदगाव खंडेश्वर तालुक्यात आहे. अमरावती २०, भातकुली ४, तिवसा ४, मोर्शी ४, चांदूररेल्वे ४ व धामणगाव तालुक्यात २६ आहेत. यावर ७२ लाख १८ हजारांच्या निधीची तरतूद आहे.३ कोटी ३४ हजारांच्या निधीची तरतूदएप्रिल ते जूनदरम्यान करण्यात येणाऱ्या पाणीटंचाईच्या कामावर ३ कोटी ३४ लाखा ४ हजारांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक भातकुली तालुक्यात ७३ लाख १४ हजार, अमरावती ५७ लाख ९५ हजार, नांदगाव ५२ लाख, तिवसा ७ लाख ४५ हजार, मोर्शी १७ लाख ९० हजार, वरुड १५ लाख २५ हजार, चांदूररेल्वे १८ लाख ६५ हजार, धामणगाव २५ लाख, अचलपूर १२ लाख ३० हजार, चांदूरबाजार ११ लाख ८ हजार, अंजनगाव १४ लाख ५० हजार, दर्यापूर १ लाख ६० हजार, धारणी १० लाख, चिखलदरा १७ लाख २० हजारांची तरतूद आहे.
जिल्ह्यात २०१ गावे तहानलेली; सात टँकरने पुरवठा, ९५ विहिरींचे अधिग्रहण
By admin | Updated: May 10, 2015 23:54 IST