शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर पंचायत समितीत अन् पीएचसीत ३० जण लेटलतीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:00 IST

धामणगाव गढी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, कनिष्ठ सहायक, एलएमव्ही, कंत्राटी वाहनचालक, इंटर्नशिप वैद्यकीय अधिकारी, परिचर व सफाई कर्मचारी अनुपस्थित असल्याचे आढळून आले. काही कर्मचारी कार्यालयीन गणवेशात नव्हते. कुणाकडे ओळखपत्र नसल्याचेही अध्यक्षांना आढळून आले.

ठळक मुद्देअध्यक्षांची भेट : गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाईचे निर्देश

अमरावती : जिल्हा परिषद अध्यक्षांनी कार्यालयात उशिरा येणाºया व दांडी मारण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी मागील काही दिवसांपासून आकस्मिक भेटीची मोहीम सुरू केली आहे. ३० जानेवारी रोजी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सकाळी ८.१० मिनिटांनी धामणगाव गढी प्राथमिक आरोग्य केंद्राला आकस्मिक भेट दिली. यावेळी १३ कर्मचारी गैरहजर आढळले. अचलपूर पंचायत समितीला सकाळी १०.१० वाजता भेट दिली असता, १६ कर्मचारी गैरहजर आढळले.धामणगाव गढी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, कनिष्ठ सहायक, एलएमव्ही, कंत्राटी वाहनचालक, इंटर्नशिप वैद्यकीय अधिकारी, परिचर व सफाई कर्मचारी अनुपस्थित असल्याचे आढळून आले. काही कर्मचारी कार्यालयीन गणवेशात नव्हते. कुणाकडे ओळखपत्र नसल्याचेही अध्यक्षांना आढळून आले. काही कर्मचारी हजर होते; मात्र त्यांची हजेरी रजिस्टरवर नोंद नसल्याचे दिसून आले. दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांची वेतन कपात, सेवा पुस्तिकेत नोंद व मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता बंद करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांना देशमुख यांनी दिले.अचलपूर पंचायत समितीतही १६ कर्मचारी गैरहजरस्थापत्य अभियंता सहायक, कनिष्ठ सहायक अनुपस्थित होते. कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी (कृषी) हजर होते. मात्र, हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी नव्हती. कनिष्ठ सहायक, हातपंप वाहनचालक, वाहक, सीडीसीओ मग्रारोहयो, बीएम, आॅपरेटर, सीसी, एसबीएम आदी कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले. या सर्वांचे वेतन कपात करण्यात यावे, हजेरी रजिस्टर, दौरा पंजी व हलचली पंजी रजिस्टर अद्ययावत ठेवावे, कर्मचाऱ्यांनी नियमित ओळखपत्र लावावे, चतुर्थश्रेणी कर्मचाºयांना कार्यालयीन गणवेश नियमित परिधान करण्याची ताकीद देण्याचे निर्देश बीडीओ जयंत बाबरे यांना अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिले.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती