शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तेरा कोटी वृक्ष लागवडीचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 23:03 IST

शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात पाळा-सालबर्डी मार्गात चक्क रस्त्याशेजारीच रोप लावण्याचा प्रताप संबंधित यंत्रणेने चालविला आहे. त्यामुळे भविष्यात ही वृक्ष मोठी झाल्यास ती तोडावीच लागेल, ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्षित केली. याप्रकरणी पाळा येथील माजी उपसरपंच नरेंद्र जिचकार यांनी माहिती देऊनही वृक्ष लागवडीचे सोपस्कार पार पडले.

ठळक मुद्देजनतेच्या पैशांचा अपव्यय : रस्त्याशेजारी वृक्षारोपण, यंत्रणांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात पाळा-सालबर्डी मार्गात चक्क रस्त्याशेजारीच रोप लावण्याचा प्रताप संबंधित यंत्रणेने चालविला आहे. त्यामुळे भविष्यात ही वृक्ष मोठी झाल्यास ती तोडावीच लागेल, ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्षित केली. याप्रकरणी पाळा येथील माजी उपसरपंच नरेंद्र जिचकार यांनी माहिती देऊनही वृक्ष लागवडीचे सोपस्कार पार पडले.मोर्शी-वरूड रस्त्यावरून पाळा मार्गाने साधारणत: दोन किलोमीटर पर्यंत वृक्षलागवड करण्यात आली. या मार्गाचे दापोरीपर्यंत रूंदीकरण प्रस्तावित असून नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कामाची सुरूवात होणार आहे. अशाच प्रकारची लागवड जि. प. बांधकाम विभागामार्फत रूंदीकरण होत असलेल्या पाळा-धानोरा रस्त्यावरही करण्यात आली आहे. नियमानुसार रस्त्यापासून तीन ते चार मिटरवर वृक्षलागवड अपेक्षित आहे. असे असताना मोर्शी-वरूड रस्त्यापासून पाळा जाताना दोन किलोमीटरपर्यंत ८ ते ८ फुटावर खड्डे करून वृक्षलागवड करण्यात आली. ही रोपटे रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीने भरलेल्या ड्रमच्या आत तर आहेच. त्याशिवाय मार्गाचे रूंदीकरण होणार म्हणून वनविभाग व बांधकाम विभागाने सर्वेक्षण करून वृक्षकटाईचे वृक्षांची नोंद घेतली. त्या वृक्षाच्या आत आहे, हे विशेष.याबाबत पाळा येथील माजी उपसरपंच तथा कृ. उ. बा. समिती संचालक नरेंद्र जिचकार यांनी शाखा अभियंता सा. बां. उपविभाग मोर्शी यांना सुरूवातीला मोबाईलद्वारे अवगत करूनही ही वृक्षलागवड करण्यात आली.शासनाने गतवर्षी ४ कोटी वृक्षलागवड केली. यात किती रोपांचे संवर्धन झालेत? हा जनतेमध्ये चर्चेचा विषय असताना यावर्षी १३ कोटी वृक्षलागवडीचा धुमधडाका सुरू आहे. एकीकडे रस्ता रूंदीकरणात बेसुमार वृक्षकटाई करण्यात आली. आता रस्ते रूंदीकरणात सीमेतच वृक्षलागवड होत असताना शासनाच्या संबंधित विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्ट होत आहे. हा प्रकार जनतेच्या पैश्याचा अपव्यय होत असल्याचा आक्षेप नरेंद्र जिचकार यांनी नोंदविला आहे.टार्गेट पूर्ण करण्यासाठी यंत्रणांची लगबग१३ कोटी वृक्षलागवडीत तालुक्याला मिळालेले टार्गेट पूर्ण करताना संबंधित शासकीय यंत्रणेच्या नाकीनऊ येत आहे. शेतकरी बांधावर वृक्षलागवड करू देत नाही. तर, यंत्रणेला झाडेही लावून दाखवायची आहे. अश्यावेळी शासनाला काय साध्य करायचे हा प्रश्न जनतेला पडलेला आहे.पाहणी करून वृक्षलागवड योग्य ठिकाणी केली जाईल. लवकरच दुरुस्ती करून नव्याने लागवड करू.- डी.एस. मांगे,उपविभागीय अभियंता,सा.बां.वि.