शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तृतीय श्रेणी कर्मचारी सर्वाधिक लाचखोर असल्याचे सांगते यंदाची राज्यातील आकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 12:03 IST

यंदा राज्यातील ११०० अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतलेली लाचेची रक्कम एकूण २ कोटी १७ लाख ७९ हजार इतकी आहे. लाच स्वीकारण्याच्या ८३९ प्रकरणांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जानेवारी ते १८ डिसेंबर या कालावधीत ११०० लाचखोरांना अटक केली.

ठळक मुद्दे११०० लाचखोरांच्या खिशात २.१७ कोटींची लाच!एसीबीचे ८३९ सापळे३७ खात्यांमध्ये केली कारवाई

आॅनलाईन लोकमतप्रदीप भाकरेअमरावती : राज्यात सुशासन आणि पारदर्शक प्रशासनाचा दावा करणाऱ्या भाजपच्या सत्ताकाळातही लाचखोरी आटोक्यात आलेली नाही. प्रशासनाला पोखरणाऱ्या ‘लाच’रूपी वाळवीवर यंदाही ‘सरकार’ अंकुश राखू शकले नाही. यंदा राज्यातील ११०० अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतलेली लाचेची रक्कम एकूण २ कोटी १७ लाख ७९ हजार इतकी आहे. लाच स्वीकारण्याच्या ८३९ प्रकरणांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जानेवारी ते १८ डिसेंबर या कालावधीत ११०० लाचखोरांना अटक केली.सन २०१६ च्या तुलनेत सापळे व अटक करण्यात आलेल्या लाचखोरांची संख्या कमी असली तरी ती भ्रष्टाचाराला लगाम लावणारी निश्चितच नाही. २०१६ मध्ये ९८५ प्रकरणांमध्ये १२०७ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. यंदा १८ डिसेंबरपर्यंत ८३९ लाचप्रकरणांत ११०० आरोपींना अटक करण्यात आली. या कालावधीत ८३९ सापळे यशस्वी करण्यात आले, तर २२ प्रकरणांमध्ये अपसंपदा बाळगल्याचा चे गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय अन्य भ्रष्टाचाराचे २८ असे एकूण ८८९ गुन्हे नोंदविण्यात आले. यापैकी मुंबई परिक्षेत्रात ४४, ठाणे परिक्षेत्रात ११५, पुणे परिक्षेत्रात १८४, नाशिक परिक्षेत्रात १२२, नागपूर परिक्षेत्रात ११५, अमरावती परिक्षेत्रात ८८, औरंगाबाद परिक्षेत्रात १२८, तर नांदेड परिक्षेत्रात ९३ गुन्हे नोंदविण्यात आले. राज्य शासनाच्या अखत्यारीतील तब्बल ३७ खात्यांमधून ही लाचखोरी उघड झाली.थेट लाच स्वीकारण्याची सर्वाधिक २०१ प्रकरणे महसूल खात्यातील आहेत. यामध्ये अडकलेल्या २७१ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ५२ लाखांची लाच घेतली. पाठोपाठ पोलिसांनी द्वितीय क्रमांक कायम ठेवला. लाचखोरीच्या १६१ प्रकरणांमध्ये २१० पोलीस अधिकारी-कर्मचारी अडकलेत. त्यांनी १७.९२ लाख रुपयांची लाच स्वीकारली.क्लास-थ्रीने गिळंकृत केलेत ९५ लाखवर्षभरात एसीबीने आठ परिक्षेत्रांमध्ये ८३९ सापळे ( ट्रॅप ) यशस्वी केलेत. यात वर्ग-१ च्या ७३ व वर्ग-२ च्या ८६ अधिकाऱ्यांनी अनुक्रमे ६८ लाख व १५.४४ लाख रुपयांची लाच स्वीकारली. त्यातुलनेत वर्ग-३ चे ७०४ कर्मचारीे एसीबी सापळ्यात आले. त्यांनी अधिकाऱ्यांना मागे टाकत तब्बल ९५.४५ लाख रुपयांची लाच स्वीकारली. वर्ग-४ च्या ५० कर्मचाऱ्यांना ५.२७ लाख रुपये घेताना अटक करण्यात आली. ९६३ लाचखोर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी २.१७ कोटी रुपयांची लाच स्वीकारताना १३७ खासगी व्यक्तींची मदत घेतली. त्यांनाही एसीबीने अटक केली.

टॅग्स :Crimeगुन्हा