शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

विना क्रमांकाच्या दुचाकीमुळे हाती लागला वाहनचोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 10:55 IST

Amravati News विना क्रमांकाची दुचाकी घेऊन फिरणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दखविताच त्याने तीन जिल्ह्यातून सात दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

ठळक मुद्देयवतमाळ, अमरावती, वाशिम जिल्ह्यात दुचाकी चोरीची कबुली सात दुचाकीसह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

 लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : विना क्रमांकाची दुचाकी घेऊन फिरणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दखविताच त्याने तीन जिल्ह्यातून सात दुचाकी चोरल्याची कबुली दिली. सदर दुचाकी वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील एका आरोपीला विकल्याचे सांगितले. सदर आंतरजिल्हा गुन्हेगाराला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने बडनेरा ठाणे हद्दीतील अकोला नाका परिसरातून ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी सकाळी करण्यात आली. त्यानंतर कारंजा येथून अन्य आरोपीला अटक केली.

पोलीससूत्रानुसार, शेख समीर ऊर्फ चिन्या शेख नजीर (३५, रा. पठाणपुरा नेर जि. यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना आरोपी हा संशयितरीत्या विना नंबर प्लेट असलेले दुचाकी वाहन घेऊन पोलिसांना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन वाहनाच्या कागतपत्राची मागणी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा पोलिसांना त्याला बारकाईन विचारपूस केली असता, त्याने अमरावती शहरातून ३, अमरावती ग्रामीणमधून १, यवतमाळ जिल्ह्यातून २, वाशिम जिल्ह्यातून १अशा सात वेेगवेगळ्या कंपनीच्या दुचाकी चोरल्याची कबुली दिली. सदर चोरीतील वाहने आरोपी शेख समीरने जावेद बेग युनूस बेग मिर्झा (३०, रा. काजीपुरा कारंजा जि. वाशिम याला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी सात वाहनासह ४ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. नमूद आरोपीला खोलापुरी गेट येथे दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे व पथकाने यशस्वी केली.

तीन दिवसांपूर्वीच मिळाली पथकाला टीप

दुचाकी चोरीतील अट्टल गुन्हेगार असलेला शेख समीर हा बडनेरा पोलीस ठाणे हद्दीत फिरत असल्याची टीप गुन्हे शाखेच्या पथकाला तीन दिवसापूर्वीच मिळाली होती. पथक त्याच्या मागावर होते. मात्र, विना क्रमांकाची दुचाकी दिसताच पोलिसांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी कारंजा येथून मुद्देमाल जप्त केल्याचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांनी सांगितले. सोमवारी दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी