एसीपींची नियुक्ती : आत्महत्येला कारणीभूत तरूण मोकळेचअमरावती : तरण्याताठ्या मुलीच्या आत्महत्येनंतर न्यायासाठी पोलिसांचे उंबरठे झिजविणाऱ्या तक्रारकर्त्या महिलेलाच सहायक पोलीस निरीक्षकाने अपमानास्पद वागणूक देऊन ‘निघ येथून’ असे म्हणत दरडावले. हा प्रकार या महिलेने अगदी काकुळतीला येऊन ‘लोकमत’कडे कथन केला. याबाबत त्रस्त महिलेने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. तक्रारीनुसार, नारायणनगर येथील ज्योती शंकर सदाफळे यांना फ्रेजरपुरा ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट यांनी अपमानास्पद वागणूक दिली. नेहाच्या आत्महत्येला कारणीभूत राहुल ठाकरे आणि अमित तायडे यांना अटक न करता शिरसाट हे प्रकरण दडपण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप नेहाची आई ज्योती सदाफळे यांनी केला.३० नोव्हेंबर २०१५ मध्ये नारायणनगर येथील नेहा ऊर्फ पूनम सदाफळे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी नेहाचा प्रियकर व होणारा पती हार्दिक पिंगळे याला अटक करण्यात आली. तक्रारींचा पाठपुरावापोटच्या मुलीच्या आत्महत्येच्या दु:खातून सावरत नेहाची आई ज्योती यांनी न्यायासाठी धडपड चालविली आहे. या प्रकरणाचा तपास एपीआय रोशन शिरसाट यांच्याकडे सोपविण्यात आल्याने ज्योती यांनी शिरसाटांची भेट घेऊन अमित तायडे आणि राहुल ठाकरे यांना अटक करण्याची मागणी केली.'मेसेज डिलिट' केल्याचा आरोपहार्दिकच्या मोबाईलवर नेहासंदर्भात अमित व राहुल यांनी पाठविलेले बदनामीकारक मेसेज डिलिट केल्याचा आरोप नेहाच्या आईने वारंवार केला आहे. हार्दिकने ते आक्षेपार्ह मेसेज, फोटो मला दाखविले होते, असेही त्या सांगतात. फिर्यादीलाच आणायला लावलेत पुरावेनेहाच्या आत्महत्येस जबाबदार अमित व राहुल या दोन तरुणांना अटक करा, अशी मागणी केल्यानंतर एपीआय शिरसाट यांनी त्यांच्याविरोधात पुरावे आणून द्या, असे सांगितले. ज्योती सदाफळे यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पुरावे म्हणून शिरसाटांसमक्ष उभे केल्यावर, पुरावे असे नकोत, दमदार हवेत, असे बजावून आणखी काही पुरावे आणण्यास सांगितले. ११ फेब्रुवारीला चार तास बसवून ठेवल्यानंतर शिरसाट यांनी ‘निघ येथून’ असे हिणवून ठाण्यातून अक्षरश: हाकलल्याचा सदाफळे यांचा आरोप आहे. ज्योती सदाफळे यांच्या तक्रारीवरुन तीन व्यक्तींचे बयाण नोंदविले. ते नकारार्थी आहे. बयाण घेताना बाहेर थांबा, असे सदाफळे यांना सांगितले. त्यांना अपमानास्पद वागणूक दिली नाही. - रोशन शिरसाट, एपीआय तथा तपास अधिकारीफ्रेजरपुऱ्याचे एपीआय रोशन शिरसाट यांच्याकडील तपास काढला. आता तपास फ्रेजरपुऱ्याचे एसीपी करतील. आत्महत्येप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली.- दत्तात्रेय मंडलिक, पोलीस आयुक्त
ते म्हणाले, ‘निघ येथून’ सीपींनी तपास काढला
By admin | Updated: February 13, 2016 00:02 IST