शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वरूड, मोर्शी तालुक्यांत यंदा नसणार पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 05:00 IST

जितेंद्र दखने लोकमत न्यूज नेटवर्क  अमरावती : यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे भूजलपातळी सरासरी चार फुटांनी वाढली. तथापि, गाळाचा ...

ठळक मुद्देपावसाचा परिणाम, जिल्हाभरात १.२७ मी.'वाॅटर लेव्हल'ची वाढ : चांदूर बाजारात जलपातळीत घट, मेळघाटात भूजल पुनभर्भरण नाही

जितेंद्र दखनेलोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे भूजलपातळी सरासरी चार फुटांनी वाढली. तथापि, गाळाचा प्रदेश असलेल्या चांदूर बाजार तालुक्यात पाणीपातळी सरासरी एक फुटाने घटली. दुष्काळात अनेक वर्षे होरपळत असणाऱ्या वरूड, मोर्शी तालुक्यांमध्ये यंदा मात्र पाणीटंचाई भेडसावणार नाही, असा विश्वास भूजल सर्वेक्षण विभागाने व्यक्त केला.  जिल्ह्यात एकूण ६३ पाणलोट क्षेत्रे असून, त्यामधून भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणाद्वारे १५० निरीक्षण विहिरींच्या भूजल पातळीची वाचने वर्षातून चार वेळा घेण्यात येतात. ऑक्टोबरअखेर घेण्यात आलेल्या भूजलपातळीच्या नोंदीचा मागील पाच वर्षांच्या ऑक्टोबर महिन्याच्या भूजल पातळीच्या सरासरीशी तुलनात्मक अभ्यास केला असता, जिल्ह्यात सरासरी १.२७ मीटरने पाणीपातळी वाढल्याचे दिसून येते. यावर्षी सर्वात जास्त १.८५ मीटरने पाणीपातळी अमरावती तालुक्यात वाढली आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात पाण्याची खोली ३० मीटरपेक्षा जास्त गेल्यामुळे तेथील जवळपास सर्वच सिंचन विहिरी, ज्यांची खोली २५ ते ३० मीटर आहे, कोरड्यात पडल्या. तालुका मुख्यालयी एकच निरीक्षण विहीर असून, त्या परिसरात उपसा नाही. यामुळे सरासरी तीन मीटर पाण्याची पातळी वाढली असल्याचे निश्चित करण्यात आले. वरूड, मोर्शी तालुक्यात गतवर्षी व यावर्षीदेखील १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला. वरूडमध्ये यंदा पाण्याची पातळी सरासरी १.५७ मीटरने व मोर्शी तालुक्यात १.५१ मीटरने वाढली, यामुळे या दोन्ही तालुक्यांमध्ये टंचाई निर्माण होणार नाही. जिल्ह्यात सरासरी ७९२.३७ मिमी पाऊस झाला. सप्टेंबरअखेर पावसाने  १०८.९३ अशी टक्केवारी गाठली. भूजलपातळीत १.२७ मिमीने वाढ झाली आहे. चांदूर बाजार तालुका हा गाळाचा प्रदेश असून, संत्रा बागायतदार कूपनलिकांतून सतत उपसा करीत आहेत. त्यामुळे या तालुक्यात आठ ते दहा वर्षांपासून पाण्याची पातळी सतत खालावत आहे. यावर्षीसुद्धा ०.२५ मीटर अर्थात सरासरी एक फुटाने पाण्याची पातळी खालावली. गाळाचा प्रदेश असल्याने यामध्ये पावसाचे पुनर्भरण जलद गतीने होत नाही. त्यामुळे येथे भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजना गरजेच्या आहेत. धारणी व चिखलदरा हा परिसर कठीण खडकाचा व उंच-सखल असल्याने येथे पावसाचे पाणी लगेच वाहून जाते. भूजलाचे पुनर्भरण पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने निरीक्षण विहिरींच्या आधारे अंदाज घेणे शक्य नाही. परंतु, भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या निरीक्षण विहिरींच्या अनुषंगाने तेथे पाणीपातळीत वाढ झाली आहे. 

या कारणांनी वाढली भूजलपातळीगतवर्षीच्या तुलनेत यंदा मुबलक पाऊस झाला. पावसाच्या दिवसांत गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. याशिवाय सततच्या पावसामुळे शेतातील ओलावा कायम राहिल्याने खरिपाच्या सिंचनासाठी विहिरीद्वारे उपसा झाला नाही. 

जलयुक्त शिवार तसेच जलसंधारणाची कामे झाल्याने भूजलात वरूड व मोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर्षी या दोन्ही तालुक्यांसह चांदूर बाजार तालुक्यात अटल भूजल योजनेंतर्गत भूजल पुनर्भरणाचे सर्वेक्षण व आराखडे तयार करण्यात येत आहेत. - विश्वास वालदे, वरिष्ठ भूवैज्ञानिक

टॅग्स :Waterपाणी