शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
4
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
5
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
6
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
7
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
8
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
9
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
10
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
11
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
12
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
13
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
14
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
15
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
16
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
17
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
18
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
19
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
20
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...

सराईत अवैध दारू विक्रेते होणार तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2016 00:09 IST

आॅक्टोबर महिन्यांच्या प्रारंभी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारुबंदी सप्ताह राबवून अवैध दारू, बनावट दारू विक्रीविरुद्ध मोहीम राबविली.

एक्साईजचा पुढाकार : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशअमरावती : आॅक्टोबर महिन्यांच्या प्रारंभी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारुबंदी सप्ताह राबवून अवैध दारू, बनावट दारू विक्रीविरुद्ध मोहीम राबविली. मात्र आता सराईत अवैध दारू विक्री, निर्मिती करणाऱ्यांविरुद्ध तडीपारीची कारवाई केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधितांची यादी तयार करण्यात आली आहे. कारवाईसाठी ती शासनाकडे पाठविली जाणार आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमावलीनुसार परवानाधारक मद्य विक्रेत्यांनाच दारू विक्री करता येते. मात्र रात्री १० ते सकाळी १० या कालावधीत अनेक ठिकाणी देशी, विदेशी अवैध दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी किरण गित्ते, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांंच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. या अवैध दारू विक्री करणाऱ्यांना दारूचा पुरवठा करणाऱ्या परवानाधारक दारू विक्रेत्यांचा एक्साईज विभाग कसून शोध घेत आहे. सराईत अवैध दारू विक्री करणारे अथवा गुन्हेगारांकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र भरून घेतले जाणार आहे. त्याअनुषंगाने एक्साईजचे निरीक्षक कामाला लागले आहे. वारंवार नोटीस बजावणे, अवैध दारू विक्री थांबविण्यासाठी सराईत अवैध दारू विक्रेत्यांना आता गावातूनच हद्दपार करण्याची प्रशासनाने रणनीती आखली आहे. त्याकरिता जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी पुढाकार घेतला आहे. अवैध दारू विक्रे त्यांवर कलम ९३ प्रमाणे कारवाई केली जाते. मात्र ही कारवाई जुजबी असल्याने अवैध दारू विक्रेत्यांवर कोणताही परिणाम होत नसल्याची बाब एक्साईजच्या लक्षात आली आहे. अवैध दारु विक्री रोखण्यासाठी एक्साईजने कृती आराखडा तयार केला आहे. आतापर्यंत अवैध दारू विक्रेत्यांवर करण्यात आलेल्या कारवाईचा आधार घेत जिल्हाभरातील तशा दारू विक्रेत्यांची तडीपार करण्यासाठी यादी तयार करण्यात आली आहे. अवैध दारू विक्रेत्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीदेखील प्रस्तावात जोडली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २० ते २५ सराईत अवैध दारू विक्रेत्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती आहे. अवैध दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने १८ व १९ आॅक्टोबर या दोन दिवशी राबविलेल्या विशेष मोहिमेत १४ अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. यात दीड लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच शहरातील दोन बियर शॉपीवर तक्रारीनुसार विभागीय गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)मद्य सेवनासाठी परवाने आवश्यकराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमावलीनुसार मद्य सेवन करण्यासाठी परवाने अनिवार्य करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने मद्य सेवनाचे परवाने सहजतेने उपलब्ध व्हावे, यासाठी एक्साईज कार्यालयात एक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. मद्य पिणाऱ्या एका व्यक्तिला दरदिवशी देशी दारू दोन रुपये, तर विदेशी दारुसाठी पाच रुपये परवान्यासाठी मोजावे लागणार आहेत. मोर्शी, अचलपूर व अमरावती येथील एक्साईजच्या कार्यालयात परवाने उपलब्ध असल्याची माहिती आहे.दारू विक्री ही शासन नियमावलीनुसार झाली पाहिजे. अवैध दारु विक्री, बनावट दारु विक्रीे रोखण्यासाठी एक्साईज विभाग कार्यरत आहे. त्यानुसार अवैध दारू विक्री करणाऱ्यांना तडीपारीचा प्रस्ताव आहे. यात जिल्हाधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.- प्रमोद सोनोने,अधीक्षक, एक्साईज अमरावती