शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय इमारतींचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 16:39 IST

महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील सरकारी वा खासगी इमारतींचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ ५० वर्षांपासून झाले नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शासनाची कानउघाडणी केली असून, इमारतींचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ सोबत फायर आॅडिट अनिवार्य केले आहे.

- गणेश वासनिक

अमरावती : महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील सरकारी वा खासगी इमारतींचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ ५० वर्षांपासून झाले नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शासनाची कानउघाडणी केली असून, इमारतींचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ सोबत फायर आॅडिट अनिवार्य केले आहे.महापालिका कायदा २५६ (१) नुसार प्रत्येक सरकारी व खासगी इमारतींचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ दर पाच वर्षांनी बंधनकारक आहे. परंतु, राज्यात ३४ महापालिकांनी लाखो इमारतींचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ केलेच नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यासोबत राष्ट्रीय भवन संहिता २००५ व २०१६ चे पालन देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थामंध्ये होत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे न्या.ए.एम. खानविलकर, न्या. डी.वाय. चंद्रचुड यांनी ६ मार्च २०१८ रोजी दिलेल्या निकालातून स्पष्ट केले आहे. सदर आदेश देताना राष्ट्रीय गुन्हे अभिलेख ब्युरो यांनी सन २०१४ मध्ये देशात घडलेल्या रहिवासी व इतर इमारतींचे यापूर्वीचे अपघात झाल्याची नोंद लक्षात घेतलेली आहे. सन २०१४ मध्ये देशात ३०, ३७७ आगीचे गुन्हे नोंदविले गेले. यात १९,५१३ लोकांचे मृत्यू झाले तर, १९,५१३ व्यक्ती गंभीर जखमी झालेत. यात राज्यात ४, ८०५ आगीचे गुन्हे नोंदविण्यात आले आहे. ही आकडेवारी देशात सर्वाधिक असून, एकूण नोंदविलेल्या प्रकरणांच्या ती २३.६ एवढी टक्केवारी आहे.   इमारतींचे नियमित ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ तसेच फायर, विद्युत तारांचे आॅडिट झाले असते तर आगीचे प्रकरण कमी झाले असते, हे वास्तव आहे. ३४ महापालिका, २५६ नगरपालिका क्षेत्रातील अनेक शासकीय इमारतींचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ झालेले नाही. परिणामी संबंधित इमारतींमध्ये अंतर्गत बदल वा वाढीव बांधकामाची माहिती प्रशासनाला मिळू शकली नाही. शासन अशा गंभीर विषयावर निष्क्रियता दाखवत असल्याने भविष्यात जीवितहानी तथा मंत्रालयासारखे मालमत्तेची हानी रोखण्यात प्रशासकीय अधिकारी अपयशी ठरले आहे.

आता तरी होईल काय आदेशाचे पालन?खासगी अथवा सरकारी इमारतींचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ६ मार्च २०१८ रोजी दिले आहे. त्यामुळे शासन, प्रशासन स्तरावर आता तरी इमारतींचे स्ट्रक्चरल, फायर, वीजेचे आॅडिट होईल काय, असा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे.

सरकारी इमारतींचे विभागनिहाय स्वामीत्व आहे. त्यानुसार संबंधित विभागांनी ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ करणे अनिवार्य आहे. गत काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या ऐतिहासीक शाळेला आग लागली होती. त्यानंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून या इमारतींचे ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ करण्यात आले. अन्य इमारती संदर्भातही आदेश दिले आहेत.- हेमंतकुमार पवार,आयुक्त, महापालिका अमरावती

टॅग्स :AmravatiअमरावतीCourtन्यायालय