शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तुरीची खरेदी, चुकारे अन् अनुदानही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 01:18 IST

तुरीची शासकीय खरेदी करण्याला नकार देत शासनाने तुरीला प्रतीक्विंटल एक हजाराचे अनुदान घोषित केले व आठ दिवसांत अनुदान देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. प्रत्यक्षात एक महिना होऊनसुद्धा घोषणेची पूर्तता अद्याप झालेली नाही. खरेदी केलेल्या तुरीचे चुकारेही मिळाले नाहीत.

ठळक मुद्देबबलू देशमुख आक्रमक : जिल्हा काँग्रेस कमिटीचा आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तुरीची शासकीय खरेदी करण्याला नकार देत शासनाने तुरीला प्रतीक्विंटल एक हजाराचे अनुदान घोषित केले व आठ दिवसांत अनुदान देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. प्रत्यक्षात एक महिना होऊनसुद्धा घोषणेची पूर्तता अद्याप झालेली नाही. खरेदी केलेल्या तुरीचे चुकारेही मिळाले नाहीत. त्यामुळे ऐन पेरणीच्या काळात शेतकरी अडचणीत सापडले आहे.शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाविरोधात बबलू देशमुख यांनी दंड थोपाटले आहे. तत्काळ चुकारे अन् अनुदान न दिल्यास जिल्हा काँग्रेस कमिटीद्वारा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शासनाला दिला आहे.कर्जमाफीच्या घोळात शेतकरी गारद झाला असताना एक वर्षानंतरही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आजही कर्जाच्या प्रतीक्षेत जिल्ह्यातील ५० ते ६० हजार शेतकरी आहे. गतवर्षी तुरीचे चांगले उत्पन्न झाले होते. त्यामुळे कर्जाची परतफेड होर्ईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना शासकीय खरेदीही बंद करण्यात आली आहे. तसेच खासगी बाजारात शेतकऱ्यांची सुमार लूट केली जात आहे. शेतकऱ्यांचा रोष घालवण्यासाठी प्रतिक्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली आहे. येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याचे आश्वासन दिले. परंतु, याला एक महिन्याचा कालावधी उलटला असताना अनुदान अद्याप मिळालेले नाही, असा आरोप बबलू देशमुख यांनी केला आहे.बोंडअळीची मदतदेखील अर्ध्याअधिक शेतकऱ्यांना मिळाला नाही. पीकविम्याची भरपाईतही ६२ हजार शेतकरी डावलले. शेतकऱ्यांची लुबाडणूक करून कंपनीचे पोट भरण्याचा गोरखधंदा चालविला आहे. शेतकऱ्यांच्याच टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार भाजप सरकारने सुरू केला असल्याचा आरोप बबलू देशमुख यांनी केला. तुरीचे अनुदान दोन दिवसांत जमा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :congressकाँग्रेस