शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

रिद्धपूर येथे परप्रांतीय नागरिकांची तपासणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 05:00 IST

कोरोना विषाणू प्रादुर्भावाने थैमान घातले असून, हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. त्याअनुषंगाने शासन व प्रशासनाने १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी, ‘लॉकडाऊन’चा निर्णय घेतला आहे. असे असताना महानुभाव पंथीयांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे दाखल झालेल्या देश-विदेशातील नागरिकांनी ‘कोरोना’ पार्श्वभूमीवर तपासणी करून घेतली अथवा नाही, ही बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली नसल्याची खंत आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देगावाला पोलीस छावणीचे स्वरूप : देवेंद्र भुयार यांनी गाठले रिद्धपूर, प्रशासन लागले कामाला

लोकमत न्यूज नेटवर्करिद्धपूर/मोर्शी : तालुक्यातील रिद्धपूर येथे देश-विदेशातून आलेल्या सुमारे ७० ते ७५ नागरिकांची तपासणी झाली नसल्याने महसूल व आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे. पणिामीे बुधवारी रिद्धपूर येथे एकच खळबळ उडाली. दरम्यान पोलिसांनी वेढल्याने गावाला छावणीचे स्वरूप आले होते. या गंभीर बाबीची दखल घेत आमदार देवेंद्र भुयार यांनी रिद्धपूर गाठून महसूल विभाग, आरोग्य, पोलीस प्रशासन, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले. तसेच आमदार भुयार यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली.कोरोना विषाणू प्रादुर्भावाने थैमान घातले असून, हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. त्याअनुषंगाने शासन व प्रशासनाने १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी, ‘लॉकडाऊन’चा निर्णय घेतला आहे. असे असताना महानुभाव पंथीयांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे दाखल झालेल्या देश-विदेशातील नागरिकांनी ‘कोरोना’ पार्श्वभूमीवर तपासणी करून घेतली अथवा नाही, ही बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली नसल्याची खंत आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली. अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे जिल्हाबाहेरील १०८, इतर राज्यातून २७ आणि विदेशातील एक नागरिक गावात दाखल असल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे गावात दहशतीचे वातावरण आहे. आमदार भुयार हे सकाळी १० वाजतापासूनच गावात ठाण मांडून होते. त्यांनी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून बाहेरील नागरिकांची तपासणी करून हातावर ‘होम क्वारंटाइन’ शिक्के मारण्याची प्रक्रिया राबवून घेतली. हल्ली हे नागरिक ‘होम क्वारंटाइन’ असल्याचे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या मोर्शी ग्रामीण परिसरात एकूण १४९७ नागरिक जिल्ह्याबाहेरील दाखल झाले असून, त्यांच्यावर गठित गावनिहाय समिती लक्ष ठेवून आहे. कोरोना विषाणू रोगाने देशभरात थैमान घातले आहे. प्रशासनाकडून नाकाबंदीनंतरही देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात नागरिक मोर्शी, वरूड तालुक्यांतील गावांमध्ये दाखल होणे ही चिंतनीय बाब आहे. आता हातावर शिक्के असलेल्यांवर आरोग्य विभाग , महसूल विभाग, पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर करडी नजर ठेवणे काळाची गरज आहे. विशेषत: आरोग्य विभागाने काळजी घेत ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ करू नये. ‘होम क्वारंटाइन’ असलेल्यांना घरातच थांबवावे, घराबाहेर प्रशासनाने पडू देऊ नये, असे निर्देश आमदार भुयार यांनी प्रशासनाला दिले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस