शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

धारणीत अग्निशमनवाहनच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:57 IST

सन २०१३ नंतर सहा वर्षांनी पुन्हा एकदा भुलोरी गावाने अग्निप्रलय अनुभवला. सहा वर्षांपूर्वीचे कटू अनुभव बाजूला सारत आदिवासी बांधवांनी नवा आशियाना उभारला. मात्र, आज पुन्हा तो आशियाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. कदाचित धारणी मुख्यालयी अग्निशमन यंत्रणा असती, तर झालेले नुकसान टळले असते, अशी भावना भुलोरी ग्रामस्थांनी व्यक्त केली. मंगळवारच्या अग्निकल्लोळाने अग्निशमन पथकाची निकड पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

धारणी : सन २०१३ नंतर सहा वर्षांनी पुन्हा एकदा भुलोरी गावाने अग्निप्रलय अनुभवला. सहा वर्षांपूर्वीचे कटू अनुभव बाजूला सारत आदिवासी बांधवांनी नवा आशियाना उभारला. मात्र, आज पुन्हा तो आशियाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. कदाचित धारणी मुख्यालयी अग्निशमन यंत्रणा असती, तर झालेले नुकसान टळले असते, अशी भावना भुलोरी ग्रामस्थांनी व्यक्त केली. मंगळवारच्या अग्निकल्लोळाने अग्निशमन पथकाची निकड पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.चार वर्षांपूर्वी धारणी ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले. नगरपंचायत वा तहसील प्रशासन आता अग्निशमन यंत्रणा उभारेल, अशी भाबडी आशा धारणीकरांना होती. मात्र ती फोल ठरली. धारणी तालुक्यात एकूण १५२ गावे आहेत. त्यातील अनेक गावे दुर्गम व अतिदुर्गम क्षेत्रात मोडतात. मात्र तालुक्यात कुठेही आग लागली की, अचलपूर, चिखलदरा पालिकेची मदत घ्यावी लागते. काही वर्षांपूर्वी सेमाडोह येथे असाच अग्निकल्लोळ उठला होता. आता भुलोरीत २०१३ ची पुनरावृत्ती झाली. त्याअनुषंगाने धारणी मुख्यालयी अग्निशमन यंत्रणा असावी, अशी आदिवासींची मागणी आहे.अग्निशामक पथक पोहोचले चार तासानेदुपारी २ वाजता आग लागल्याची माहिती मिळताच तालुका प्रशासनाने अचलपूर नगरपालिकेचे अग्निशमन वाहन व पथक बोलाविले. ते ९० किमी प्रवास करुन सायंकाळी ६ च्या सुमारास भुलोरी येथे पोहोचले. तत्पूर्वी बºहाणपूर, खंडवा व चिखलदरा येथील पथक पोहोचले.यांची जळाली घरेभुलोरी येथे मंगळवारी लागलेल्या आगीत मनीराम जांभेकर, राधाकिसन मावस्कर, नारायण सज्जुलाल मावस्कर, राजाराम धांडे, कलांसिंग भिलावेकर, धनु कासदेकर, भाऊलाल दहेकर, रामसिंग कासदेकर, बिसराम दहेकर, किशोर भिलावेकर, नामदेव जावरकर, शंकर जावरकर, शालिकराम भिलावेकर, हरिराम दहेकर, मोतीराम सानू, मान्सू भिलावेकर, रमेश सेलेकर, झनकलाल कासदेकर यांची घरे जळाली.