शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

राज्यात आरागिरण्यांचे ‘फायर आॅडिट’ नाही; धोकादायक स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 2:52 PM

राज्य शासनाच्या उद्योग व कामगार विभागाने आरागिरणी उद्योग हे ‘डेंजर इंडस्ट्रीज’ जाहीर केले असताना आरागिरण्यांचे परवाना नूतनीकरण करतेवेळी ‘फायर आॅडिट’ तपासले जात नाही. परिणामी चार हजार आरागिरण्या धोकादायक स्थितीत सुरू असल्याचे वास्तव पुढे आले आहे.

ठळक मुद्देउद्योग व कामगार विभागाचा आदेशाला फाटा

गणेश वासनिक।आॅनलाईन लोकमतअमरावती : राज्य शासनाच्या उद्योग व कामगार विभागाने आरागिरणी उद्योग हे ‘डेंजर इंडस्ट्रीज’ जाहीर केले असताना आरागिरण्यांचे परवाना नूतनीकरण करतेवेळी ‘फायर आॅडिट’ तपासले जात नाही. परिणामी चार हजार आरागिरण्या धोकादायक स्थितीत सुरू असल्याचे वास्तव पुढे आले आहे.उद्योग व कामगार विभागाने ७ जुलै १९८१ रोजी आरागिरणी उद्योग धोकादायक उद्योग जाहीर केलेला आहे. त्यामुळे आरागिरणी परवान्यांचे नूतनीकरण करताना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ‘किमान प्रदूषण प्रमाणपत्र’ तसेच महापालिका, नगरपालिका हद्दीतील आरागिरण्यांचे ‘फायर आॅडिट’ करणे नियमावली आहे. मात्र, १२ वर्षांपासून आरागिरण्यांचे ‘फायर आॅडिट’ झाले नसताना संबंधित वनाधिकाऱ्यांनी दरवर्षी परवान्यांचे नूतनीकरण सर्रास करीत आहे. लाकूड हे पेट्रोलपेक्षा अतिशय ज्वलनशिल असून तो गतीने पेट घेतो. या गंभीर बाबीची दखल मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक, महापालिका आयुक्त किंवा मुख्याधिकाऱ्यांनी घेऊ नये, हे आश्चर्य मानले जात आहे.नागरी वस्त्यांशेजारी असलेल्या आरागिरणीतून निघणारा धूर, प्रदूषण आणि प्रसंगी आग लागल्याने वाढत्या तापमानाने प्राणीमात्राचे प्रचंड नुकसान होते. या महत्त्वाच्या बाबीसाठी आरागिरण्यांचे ‘फायर आॅडिट’ अनिवार्य करण्यात आले आहे. आरागिरणींना उद्योेगाचा दर्जा मिळाल्याने त्यांच्या ‘फायर आॅडिट’साठी वरिष्ठ वनाधिकारी, महापालिका आयुक्त, मुख्याधिकारी हे कधीही पुढे सरसावले नाहीत. गेल्या १२ वर्षांपासून ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा आरागिरणी नूतनीकरणाचा कारभार सुरू आहे. ‘फायर आॅडिट’ची संकल्पना २००५ मध्ये राष्ट्रीय इमारत संहितेनुसार सुरू झाली. मात्र, या संहितेचे पालन करण्यात राज्य शासन माघारले आहे.शासकीय इमारती ‘फायर आॅडिट’पासून वंचितराज्यात २६ महापालिका, २५६ नगरपालिका हद्दीतील सर्व शासकीय इमारतींचे फायर आॅडिट सन २००६ पासून आजतागायत नियमांच्या तरतुदीनुसार करण्यात आले नाही. महापालिका अ‍ॅक्ट कलम २५६ (१) नुसार ‘स्टॅबिलिटी सर्टिफिकेट’ हे १०० वर्षांपूर्वीच्या इमारतीसाठी कुणीही घेतलेले नाही. ही बाब अत्यंत गंभीर व त्या इमारतीत राहणारे आणि वावरणारे व्यक्तिंच्या जीविताची हानी करणारी आहे.हे असावेत आग प्रतिबंधक साहित्यआरागिरणी हा उद्योग ‘डेंजर इंडस्ट्रीज’मध्ये गणला गेला आहे. त्यामुळे महापालिका किंवा नगरपालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांकडून आरागिरणींचे ‘फायर आॅडिट’ करणे नियमावली आहे. यात मुबलक पाणी व्यवस्था, अग्निशमन यंत्रे, जलवाहिनी, वॉटर सोर्स, वाळूने भरलेल्या बकेट आदी साहित्य ठेवावे लागते. मात्र, राज्यात चार हजार आरागिरणींचे ‘फायर आॅडिट’ करून परवान्याचे नूतनीकरण झाले नाही.‘फायर आॅडिट’ व्हावे, हे शासन निर्णय आहे. मात्र, ज्यांचे नाहरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज प्राप्त झालेत त्यांचे ‘फायर आॅडिट’ केले जाते. परंतु आजतागायत आरागिरणी मालकांनी ‘फायर आॅडिट’ केलेले नाहीत.- भरतसिंह चव्हाण,अग्निशामक अधिकारी, अमरावती महापालिका

टॅग्स :Governmentसरकार