शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
3
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
4
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
5
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
6
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
7
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
8
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
9
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
10
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
11
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
12
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
13
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
14
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
15
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
16
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
17
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
18
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
19
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
20
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल

विद्यापीठात सफाई कंत्राटात ई-निविदा नाही

By admin | Updated: April 8, 2017 00:14 IST

तीन लाखांच्यावरील व्यवहार करताना ई-निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी घेतला आहे.

कुलगुरुंचे निर्णय गुंडाळले : पाच एप्रिल रोजी निविदा सूचना जारीअमरावती : तीन लाखांच्यावरील व्यवहार करताना ई-निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी घेतला आहे. तथापि बुधवारी ५ एप्रिल रोजी विद्यापीठ परिसरातील स्वच्छता व साफसफाई कंत्राटदार नेमण्यासाठी निविदा सूचना काढली आहे. मात्र हा कंत्राट ई- निविदेद्वारे सोपविला जाणार नाही, हे विशेष.राज्य शासनाच्या निर्णयानुसार तीन लाखांच्यावरील कोणत्याही व्यवहारासाठी ई-निविदा आवश्यक आहे. मात्र दीड वर्षाचा कालावधी लोटला असताना विद्यापीठ प्रशासन वेबपोर्टलवर निविदा प्रकाशित करून मर्जीतील अथवा जवळील व्यक्तींकडे कंत्राट सोपवितात, असा कारभार सुरु आहे. परंतु या परंपरागत पद्धतीला फाटा देत ई-निविदा प्रक्रियेतूनच तीन लाखांच्यावरील व्यवहार होतील, असे स्वत: कुलगुरुंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना गुरुवारी स्पष्ट केले. मात्र एक दिवसापूर्वीच बुधवारी ई-निविदेविनाच सफाई, स्वच्छतेबाबतच्या निविदा बोलाविल्या आहेत. यामध्ये एक वर्षाच्या सफाई कंत्राटाकरिता अनामत रक्कम भरण्यापासून सूट असल्यास सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र, मुंबई दुकाने व संस्था अधिनियम १९४८ अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेचे निपटारा प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, वित्तीय संपन्नतेचा पुरावा आदी अनिवार्य करण्यात आले आहे. या कंत्राटासाठी विद्यापीठाच्या सामान्य प्रशासन विभागात बंद लिफाफ्यात २६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत निविदा स्वीकारण्यात येतील. २७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता निविदा धारकांसमोर निविदा समिती याबाबत निर्णय घेणार आहे. परंतु स्वच्छता व सफाईचा खर्च हा वर्षाकाठी लाखोंचा असताना ई-निविदा का मागविल्या नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे. यापूर्वी परीक्षेशी संबंधित आॅनलाईन ‘एन्ड टू एन्ड’ या कामांसाठी देखील विद्यापीठाच्या वेबपोर्टलवर निविदा मागविण्याचा प्रताप करण्यात आला होता. परिणामी ११० दिवसांनंतरही परीक्षेचे आॅनलाईन निकाल विद्यापीठाला लावता आले नाही. कुलगुरुंनी तीन लाखांच्यावरील व्यवहारासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला असताना प्रशासन मात्र कुलगुरुंच्याही निर्णयाला जुमानत नाही, असे दिसून येते. विद्यापीठात दीड वर्षांपासून ई-निविदेसाठी यंत्रणा उभारता आली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)