शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

घरी बोअरवेल आहे काय? ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:39 IST

शहरात बोअरवेलची संख्या अनिर्बंध वाढून अमर्याद उपसा सुरू असल्याने भूजलस्तर कमालीचे घटले आहे. यासाठी ज्या घरी बोअर आहेत, त्यांना आता ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य करण्यात आले आहे. महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिले आहे.

ठळक मुद्देमहापालिका आयुक्तांचे निर्देश : मजीप्रा नळ देयकांसोबत देणार नागरिकांना नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात बोअरवेलची संख्या अनिर्बंध वाढून अमर्याद उपसा सुरू असल्याने भूजलस्तर कमालीचे घटले आहे. यासाठी ज्या घरी बोअर आहेत, त्यांना आता ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य करण्यात आले आहे. महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिले आहे. नळाच्या पुढील देयकासोबत याविषयीची नोटीस आता ज्या घरी बोअर आहेत, त्यांना बजावली जाणार आहे.शहरात पाणीटंचाई नाही, याचा अर्थ असाही नाही की, पाण्याचा अनिर्बंध वापर करावा. मजीप्राद्वारे शहराला पाणीपुरवठा होत आहे. या प्रक्रियेत पिण्याच्या पाण्याचा वापर नागरिक रस्त्यावर टाकण्यासाठी, गाड्या धुणे व इतर कामांसाठीही करीत आहेत. शहरातील बहुतांश नागरिकांच्या घरी नळाव्यतिरिक्त बोअरवेलदेखील आहेत. त्याद्वारे भूगर्भातील पाण्याचा वारेमाप उपसा होत आहे. त्याच्या तुलनेत भूजल पुनर्भरण होत नसल्याने दिवसेंदिवस शहराची भूजल पातळी खोल जात आहे. यावर उपाययोजना म्हणून भूजलस्तरात वाढ होण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग व शोषखड्डा या मुद्द्यावर महापालिका आयुक्त संजय निपाणे आग्रही आहेत. त्यांनी याविषयी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना दोन वेळा पत्र बजावले. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी महत्त्वपूर्ण यंत्रणा या नात्याने शहरात ज्या नागरिकांच्या घरी बोअरवेल आहे, त्यांना शास्त्रीय पद्धतीने शोषखड्डा व रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बंधनकारक करावी. त्यासाठी नळाचे देयकासोबत संबंधित नागरिकांना याविषयीची नोटीस बजावण्यात यावी व मजीप्रा स्तरावरूनही कारवाई व्हावी, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.भूजल पुनर्भरणसाठी १२२४ ठिकाणी उपाययोजनाशहरात एका महिन्याच्या अवधीत १२२४ ठिकाणी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आयुक्त संजय निपाणे यांनी सर्वप्रथम स्वत:च्या निवासस्थानी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून महापालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अनिवार्य केले होते. यानंतर एक महिन्याच्या अवधीत ५२ अधिकारी व २६४ कर्मचाऱ्यांनी घरी तसेच महापालिकेच्या आठ कार्यालयांत ही यंत्रणा उभारली. ९० उद्याने, ४० बगीचे, महापालिकेच्या रस्त्याचे बाजूला कंत्रादारामार्फत १३ ठिकाणी शोषखड्ड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त क्रेडाईमार्फत महापालिका हद्दीतील १९२ सदनिकांत रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले. महापालिकेच्या सर्व माध्यमांच्या ३० शाळा, ३० दवाखाने तसेच २१७ नागरिक व इतर सहभागातून ५१० तसेच ५६ आरओ प्लांटमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग व शोषखड्ड्यांची निर्मिती करण्यात आली. हा जलजागृतीचा परिणाम आहे.रस्ता बांधकामाच्या २०० मीटर अंतरात शोषखड्डाशहराची भूजलपातळी घटल्याने सिमेंट रस्त्यावरून वाहत जाणाऱ्या पाण्याचे पुनर्भरण होण्यासाठी आता रस्त्याच्या २०० ते ३०० मीटर अंतरात शोषखड्डा तयार केला जाणार आहे. महापालिकेचे उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्याकडून बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना याबाबत पत्र देण्यात आले. शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबत भूजलस्तर दिवसेंदिवस खालावत जात आहे. त्यामुळे सामूहिक व्यवस्थापन व नियोजन अगत्याची असल्याची बाब उपायुक्तांनी स्पष्ट केली.

टॅग्स :Rainपाऊस