शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

अद्याप १.८७ लाख पोते यार्डात

By admin | Updated: May 19, 2017 00:39 IST

सद्यस्थितीत जिल्ह्यात नाफेडव्दारा ११ केंद्रांवर तुरीची शासकीय खरेदी सुरू असली तरी बाजार समितींच्या मार्केट यार्डात

नाफेड केंद्रांची स्थिती : जिल्ह्यात ११ केंद्रांवर तूर खरेदी सुरू लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : सद्यस्थितीत जिल्ह्यात नाफेडव्दारा ११ केंद्रांवर तुरीची शासकीय खरेदी सुरू असली तरी बाजार समितींच्या मार्केट यार्डात एक लाख ८७ हजार पोते तूर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. आतापर्यंत नाफेडव्दारा दोन हजार २६६ शेतकऱ्यांची ४२ हजार १५१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. शासनाने तूर खरेदीचा निर्णय घेतल्यानंतर १० मे पासून आज तारखेपर्यंत बाजार समितींमध्ये दोन लाख ५१ हजार ४५३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली, तर १० हजार ४५० शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले आहेत. १७ मे रोजी ७७७ शेतकऱ्यांची १३ हजार ६९९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. यामध्ये चांदूररेल्वे केंद्रावर ४७ शेतकऱ्यांची ८५०.९७ क्विंटल, नांदगाव खंडेश्वर केंद्रावर २९ शेतकऱ्यांची ५७९.८७, मोर्शी केंद्रावर १८ शेतकऱ्यांची २९६.६१, अमरावती केंद्रावर एक शेतकऱ्याची २८.२८, धामणगाव केंद्रावर १६० शेतकऱ्याची १७००, अंजनगाव केंद्रावर ११४ शेतकऱ्यांची १९८८, चांदूरबाजार केंद्रावर ७६ शेतकऱ्यांची, दर्यापूर केंद्रावर ५४ शेतकऱ्यांची १२५७.११, वरुड केंद्रावर ११२ शेतकऱ्यांची, १८४० व नव्याने सुरू करण्यात आलेल्या तिवसा केंद्रावर १२ शेतकऱ्यांची १९०.४० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. या केंद्रावर एकूण १० हजार ४५० शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले आहेत. यामध्ये चांदूररेल्वे ५८४, नांदगाव १ हजार ४३, मोर्शी ८१५, अमरावती १ हजार ७२९ धामणगाव रेल्वे ८६३, अचलपूर १ हजार २५३, अंजनगाव सुर्जी १ हजार २५७, चांदूरबाजार ६३१, दर्यापूर १ हजार ६२, वरुड १ हजार १८० व धारणी तालुक्यात ३३ शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले आहेत. या शेतकऱ्यांना तूर खरेदीच्या आदल्या दिवशी यंत्रणांवर फोन करून खरेदीची माहिती दिली जात आहे. अमरावती तालुक्यात ४५ हजार पोते पडून जिल्ह्यात सद्यस्थितीत १.८७ लाख पोते तूर विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये सर्वाधिक ४५ हजार पोते अमरावती बाजार समितीत आहे. अचलपूर २२ हजार, अंजनगाव सुर्जी १७ हजार, चांदूरबाजार ८ हजार, चांदूररेल्वे ८ हजार, दर्यापूर २५ हजार, धामणगाव रेल्वे २५ हजार, मोर्शी १७ हजार, नांदगाव खंडेश्र्वर ८ हजार, तिवसा २ हजार व वरुड तालुक्यात अंदाजे १० हजार पोते यार्डात पडून आहेत. मुदतवाढीच्या निर्णयानंतर ४२ हजार क्विंटल खरेदी केंद्रांना ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्यानंतर नाफेडव्दारा २,२६६ शेतकऱ्यांची ४२,१५०.३० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. यामध्ये चांदूररेल्वे ३,१६८ क्विंटल, नांदगाव २,९५७, मोर्शी ५९३, अमरावती २८, धामणगाव ४,१६६, अचलपूर ६,७०५, अंजनगाव सुर्जी ३,५५०, चांदूरबाजार १०,१८६, दर्यापूर २,७७०, वरुड ७,८३० व तिवसा केंद्रावर १९३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.