शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बिगर आदिवासी शोधताना माध्यमिक, उच्च माध्यमिकची दमछाक की लपवाछपवी?

By गणेश वासनिक | Updated: September 26, 2022 16:37 IST

न्यायालयाकडून न्याय ; संस्थाचालक गप्प, यंत्रणेकडून उदासीनता, नागपूर शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्राने खळबळ

अमरावती : बिगर आदिवासी कर्मचारी व अधिका-यांनी बनावट जातप्रमाणपत्रांवर आदिवासी समाजाच्या राखीव जागा बळकावलेल्या आहेत. या राखीव जागा रिक्त करुन बिगर आदिवासी कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करुन आदिवासींच्या राखीव जागा रिक्त करण्याचे आदेश आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांनी न्यायालयात सादर शपथपत्रानुसार १२, ५०० जागांवर बिगरआदिवासी कर्मचारी, अधिकारी असल्याची माहिती आहे.

पुणे येथील शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व विभागांच्या शिक्षण उपसंचालकांना अनुसूचित जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र सादर करु न शकणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिसंख्य पदावर वर्ग करण्याच्या अनुषंगाने ८ जुलै २०२२ रोजी पत्र पाठवून माहिती मागितली आहे. बिगर आदिवासी शोधताना माध्यमिक शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक यांची दमछाक होते की लपवाछपवी? हा प्रश्न अनुत्तरित असून शिक्षण सम्राट, संस्थाचालक मात्र गप्प आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने २१ डिसेंबर २०१९ रोजी शासनादेश जारी केला. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन पाच वर्षे व शासन निर्णय निर्गमित होऊन तीन वर्षे झाले. तरी बिगर आदिवासी शोधून अधिसंख्य पदावर वर्ग करण्यासाठी शिक्षण यंत्रणेला कमालीचा कस लागत असून बनव्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची मोजदाद अजूनही चालूच आहे. आदिवासी उमेदवार आपल्या घटनात्मक हक्काची नोकरी मिळाली पाहिजे म्हणून तडफडत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी १८ ऑगस्ट २०२२ रोजी पत्र निर्गमित करून अधिनस्त असलेल्या अनुदानित, विनाअनुदानित शाळांच्या सर्व मुख्याध्यापकांना आदेशित करुन अनुसूचित जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र सादर करु न शकलेल्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करुन माहिती मागविली आहे. नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना २० सप्टेंबर २०२२ ला पत्र देऊन अनुसूचित जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र सादर करु न शकणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची सेवा अधिसंख्य पदावर वर्ग करण्याची कारवाई तात्काळ करुन माहिती मागविली आहे.वेतन पथकाची मुख्याध्यापकांना तंबी

माध्यमिक नागपूरच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाने सर्व मुख्याध्यापकांना २२ सप्टेंबर २०२२ ला पत्र देऊन अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची माहिती ऑक्टोबर २०२२ च्या नियमित वेतन देयकासोबत सादर करावी. त्याशिवाय देयक स्वीकारले जाणार नाही. अशी तंबी दिली आहे.

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्रGovernmentसरकार