शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

- तर कायदा हातात घेऊ

By admin | Updated: December 15, 2014 22:47 IST

स्थानिक वडाळी येथील बंद असलेल्या देशी दारु विक्रीच्या दुकानाबाबत नव्याने मतदान घेण्याला कडाडून विरोध नोंदविण्यासाठी सोमवारी महिला आंदोलकांनी येथील राज्य उत्पादक शुल्क आणि

वडाळीतील दारु दुकानाचा प्रश्न : महिलांची एक्साईज, कलेक्टररेटवर धावअमरावती : स्थानिक वडाळी येथील बंद असलेल्या देशी दारु विक्रीच्या दुकानाबाबत नव्याने मतदान घेण्याला कडाडून विरोध नोंदविण्यासाठी सोमवारी महिला आंदोलकांनी येथील राज्य उत्पादक शुल्क आणि जिल्हाधिकारी कार्यालय गाठून कैफियत मांडली. देशी दारुचे दुकान सुरु करण्यासाठी पुन्हा मतदान घेतले तर कायदा हातात घेऊ, असा इशारा देखील महिलांनी दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी कायदा, सुव्यवस्थेबाबत न्यायालयात वस्तुस्थिती कळविली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर महिलांचा आक्रोश कमी झाला, हे विशेष.मतदान मलाही नकोच- जिल्हाधिकारीसोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कक्षात झालेल्या चर्चेदरम्यान वडाळी येथील देशी दारु विक्रीच्या दुकानाबाबत मलाही मतदान प्रक्रिया नको आहे, अशी प्राजंळ कबुली जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी आंदोलक महिलांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना दिली. येत्या दोन दिवसांत उच्च न्यायालयाला पत्र पाठवून मतदान नव्हे तर हे दुकान अन्य ठिकाणी हलविण्याचे कळविले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मागील दोन दिवसांपासून सुरु असलेले आंदोलन, महिलांची भूमिका न्यायालयाला कळविली जाणार आहे. यावेळी पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे हे उपस्थित होते.एक्साईजच्या अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा प्रयत्नआंदोलक महिलांनी येथील एक्साईजचे कार्यालय गाठताच निरिक्षक एस.जे. ठाकूर यांना काळे फासण्याचा वारंवार प्रयत्न झाला. मात्र ही बाब ठाकूर यांच्या लक्षात येताच त्यांनी वरिष्ठांशी बोलायचे आहे, असे सांगून कसेबसे दालनातून बाहेर पडले. परंतु त्यांच्या मदतीला धावून आलेले उपनिरीक्षक एस.एस. रंधे यांना महिलांनी कक्षातच रोखून धरले.रस्त्यावरच महिलांचा ठिय्यावडाळी येथील देशी दारु विक्रीचे परवाना धारक प्रभू झांबानी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात धाव घेवून बंद असलेल्या दुकानाबाबत न्यायनिर्वाळा करण्याची विंनती केली आहे. त्यानुसार न्यायालयाने जिल्हाप्रशासनाला या दुकानाबाबत योग्य निर्णय घेत अहवाल कळविण्याचे कळविले आहे. त्यानुसार बंद असलेल्या या देशी दारु विक्रीच्या दुकानासाठी पुन्हा मतदान घेण्याचे प्रतीज्ञापत्र महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांनी उच्च न्यायालयात सादर करुन २८ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया घेण्याचे ठरविले आहे. परंतु वडाळीतील महिलांना हे देशी दारु विक्रीचे दुकान कायमस्वरुपी हद्दपार हवे असून आता कोणतीही मतदान प्रक्रिया नको आहे. त्यामुळेच आंदोलक महिलांनी रविवारी या बंद असलेल्या दारुच्या दुकानासमोर रस्त्यावरच ठिय्या मांडला. प्रशासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी देत देशी दारु विक्रीच्या दुकानाला कडाडून विरोध केला. फ्रेजरपुरा पोलिसांनी कसेबसे महिलांची समजूत घालत वेळ निभवून नेली. मात्र आज सोमवार उजाळताच पुन्हा या आंदोलक महिलांनी सकाळी ११.३० वाजताचा सुमारास प्रारंभी येथील राज्य उत्पादक शुल्क विभागाचे कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महिलांनी प्रचंड गोंधळ घातला. आंदोलक महिलांनी अख्ख्ये एक्साईज कार्यालय डोक्यावर घेतले. या कार्यालयातील काही रजिस्टरची फेकफाकही केली. यावेळी एक्साईजचे निरिक्षक एस.जे. ठाकूर, उपनिरिक्षक एस.एस. रंधे यांनी महिलाना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्या काही केल्याविना ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. रोष, अधिकाऱ्यांवर आरोप- प्रत्यारोप, अश्लिल शिविगाळ असा सतत उपक्रम सुरुच महिलांचा राहिला. कालातंराने सिटी कोतवालीचे पोलीस दाखल झाले. एक्साईजमध्ये पोलीस पोहचताच महिलांचा आक्रोश पुन्हा वाढला. मतदान होणार नाही, या ठोस आश्वासनाशिवाय कार्यालय सोडणार नाही, अशी मागणी महिलांनी रेटून धरली. एक्साईजच्या अधिकाऱ्यांना घेरुन ठेवताना जिल्हाधिकारी आल्याशिवाय एक्साईज कार्यालय सोडणार नाही, ही अट महिलांनी कायम ठेवली. परिणामी काही वेळ पोलिसांसोबतही त्यांचा वादही झाला. सिटी कोतवालीचे ठाणेदार दिलीप इंगळे यांनी आंदोलक महिलांना कार्यालयातून बाहेर काढण्यासाठी महिला पोलिसांना तंबी दिली. यावेळी महिलांची पोलिसांसोबत तू-तू, मै-मै सुद्धा झाली. अखेर दोन तासाच्या रस्सीखेचानंतर आंदोलक महिलांना एक्साईज कार्यालयाच्या बाहेर काढण्यात पोलिसांना यश मिळाले. यावेळी महिलांनी अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना शिव्याशाप देण्याची कोणतीही कसूर सोडली नाही. परिस्थिती चिघडण्याच्या मार्गावर असताना अखेर पोलिसांनी महिलांना कसेबसे ताब्यात घेतले.