शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

- तर आमचे हात मोकळे; पप्पू पाटलांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:18 IST

मनसेचे शहरप्रमुख संतोष बद्रे यांच्यावरील हल्ल्यामागे शासकीय जमिनीसंबंधीचा वाद असून, आमदार बच्चू कडू यांनी या विषयात अडसर आणल्यास आमचे हात मोकळे असल्याचा इशारा मनसेचे जिल्हा संघटक मंगेश ऊर्फ पप्पू पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेतून दिला.

ठळक मुद्देमनसेची पत्रपरिषद : बद्रेवरील हल्ल्यामागे बच्चू कडूंचे जमिनीचे राजकारण

अमरावती : मनसेचे शहरप्रमुख संतोष बद्रे यांच्यावरील हल्ल्यामागे शासकीय जमिनीसंबंधीचा वाद असून, आमदार बच्चू कडू यांनी या विषयात अडसर आणल्यास आमचे हात मोकळे असल्याचा इशारा मनसेचे जिल्हा संघटक मंगेश ऊर्फ पप्पू पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेतून दिला.अचलपूर तालुक्यातील भूगाव येथे शासकीय जागेवरील स्थानिकांचे अतिक्रमण काढून परप्रांतीयांना स्थायिक करण्याचा डाव बच्चू कडू रचत आहेत. त्याविरुद्ध भूगावच्या सरपंचांसह अनेक नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन उभारले आहे. शासकीय जमीन हडपणे हा आमदार बच्चू कडू यांचा व्यवसाय असून, भूगावच्या ४५ एकर जागेवर त्यांची वक्रदृष्टी आहे. याविरुद्ध मनसेने आवाज बुलंद केला होता. बच्चू कडू मुंबईत राज ठाकरे यांच्याविरुद्ध बोलले, त्याला या प्रकरणाची किनार आहे, अशी माहिती पप्पू पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली.भूगाववासीयांच्या मागण्या १५ दिवसांत मान्य करवून घेण्याचा मनसेचे संकल्प आहे. या प्रक्रियेत बच्चू कडू यांनी जराही हस्तक्षेप केल्यास आमचे हात मोकळे आहेत, असा इशारा पप्पू पाटील यांनी दिला. बद्रे यांच्यावर भ्याड हल्ला करणाºया तुषार पुंडकर या गुंडावर खुनाचे आरोप आहेत. एकटे बघून भ्याड हल्ला करणे हे शौर्य नाही. बच्चू कडूंच्या भावावर कशा स्वरूपाचे आरोप आहेत, याबाबतचा चिठ्ठा काढला, तर आ.कडूंना तोंडही दाखवायला जागा उरणार नाही, असे आक्रमक वक्तव्य पाटील यांनी केले.महत्त्वशून्य लोकांबाबत मला बोलायचे नाही. जमिनीबाबत हेच सांगेन की, भटक्या जमातीतील गरजू लोकांना घरे मिळवून देणे इतकाच उद्देश आहे. स्थानिक की परप्रांतीय, याऐवजी ते गरीब आहेत इतकेच मला ठाऊक आहे.- बच्चू कडू, अपक्ष आमदार