शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

- तर भातकुली तहसील कार्यालयाला कुलूप ठोकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 01:48 IST

अमरावतीत असलेले भातकुली तहसील कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे, अन्यथा ५ जुलै रोजी भातकुली तहसील कार्यालयास कुलूप ठोकणार, असा निर्वाणीचा इशारा युवा स्वाभिमान पार्टीने दिला आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना मंगळवारी निवेदन सादर करण्यात आले.

ठळक मुद्देयुवा स्वाभिमानचा इशारा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, ५ जुलै रोजी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावतीत असलेले भातकुली तहसील कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे, अन्यथा ५ जुलै रोजी भातकुली तहसील कार्यालयास कुलूप ठोकणार, असा निर्वाणीचा इशारा युवा स्वाभिमान पार्टीने दिला आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना मंगळवारी निवेदन सादर करण्यात आले.भातकुली तहसील कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यासंदर्भात शासनाचे महसूल व वन विभागाचे अवर सचिव नि.पा. आव्हाड यांनी १५ जून २०१७ रोजी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळविले आहे. भातकुली तहसील कार्यालय हे अमरावतीत नव्हे, तर तालुक्याच्या ठिकाणी असावेत, याकरिता रिट याचिका क्रमांक ३९११/२०१७ अन्वये निकाल लागला आहे. तसे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शासनाला दिले आहे. असे असताना राजकीय दबावापोटी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे भातकुली तहसील कार्यालय स्थलांतरित झाले नाही. मात्र, ५ जुलै अगोदर तहसील कार्यालय स्थलांतरित झाले नाही, तर कुलूप ठोकले जाईल, असा ईशारा देण्यात आला आहे. सध्या भातकुलीत ग्रामीण रूग्णालय, पोलीस ठाणे, कृषि कार्यालय असताना तहसील कार्यालयाचे स्थलांतरण का नाही, असा सवाल युवा स्वाभिमान पार्टीने उपस्थित केला आहे. भातकुली तहसील कार्यालय अमरावतीत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना ३० ते ३५ कि.मी. अंतर गाठून कामानिमित्त अमरावती ये- जा करावी लागते. तहसील कामानिमित्त २०० रुपयांचा भुर्दंड पडत आहे. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी मंजूर झालेले तहसील कार्यालय स्थलांतरित करावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा राजू रोडगे, जीतू दुधाने, मंगेश पाटील, राजू हरणे, रेखा पवार, गिरीश कासट, मयुरी कावरे, जया तेलखंडे, प्रदीप थोरात, पुरूषोत्तम खर्चान, शंकर डोंगरे, श्रीकृष्ण पाटील, आशिष कावरे, नरेंद्र तेलखडे, बाळू मिलखे आदींनी दिला.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार