लोणीकर : मजीप्राचे विभागीय कार्यालय सुरूअमरावती : पाणी पुरवठ्यासाठी यापूर्वी अनेक योजना राबविण्यात आल्यात. गावात जलकुंभ उभे आहेत. पण, नळाला पाणी नाही, ही समस्या राज्यात सगळीकडे सारखीच आहे. त्यामुळे नद्यांचे गाळ काढणे, खोलीकरण करुन पाणीस्त्रोत वाढविले जातील, म्हणजेच नद्यांची ‘अँजिओप्लास्टी’ करु, असे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी येथे शनिवारी केले.मालटेकडी नजीकच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विभागीय मुख्य अभियंता कार्यालयाच्या शुभारंभाप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रवीण पोटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ.रमेश बुंदिले, आ. रणधीर सावरकर, मजिप्राचे सदस्य सचिव हेमंत लांडगे, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अनिल भंडारी, मुख्य अभियंता गणेश गोखले आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ना. लोणीकर यांनी राज्यातील ग्रामीण भागात उद्भवलेली पाण्याची समस्या विषद केली. देशाला स्वातंत्र्य मिळून ६६ वर्षांचा काळ लोटला असताना आजही खेड्यात ग्रामस्थांना नदी, ओढे, विहिरीतील पाणी प्यावे लागते, ही दुर्देवी बाब आहे. दरवर्षी दूषित पाण्याने अनेक लोक मृत्यृमूखी पडतात. तर आजारही बळावत आहेत. यापूर्वीच्या शासनकर्त्यांनी पाणी पुरवठ्याच्या योजना राबविल्यात. पण, त्या पूर्णत्वास गेल्या नाहीत. ‘फिडबॅक’ घेणारा मंत्री मिळाला- पालकमंत्रीराज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला कामे झाल्यानंतर स्वत: फोन करुन तुमचे काम झाले, असे सांगणारा बबनराव लोणीकर यांच्यासारखा मंत्री मिळाला आहे, असे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सांगितले. खऱ्या अर्थाने ते ‘फिडबॅक’ घेणारे मंत्री आहेत. १५ वर्षात रखडलेली कामे पाच महिन्यांत करुन स्वतंत्र सहा विभाग केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ४८ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याचा मुद्दा पालकमंत्र्यांनी मांडला.
- तर नद्यांची ‘अँजिओप्लास्टी’ करु
By admin | Updated: May 10, 2015 00:42 IST