शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील वायगावच्या प्रख्यात गणपती मंदिरात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 21:04 IST

नवसाला पावणारे वायगावचे गणपती विभागात प्रसिद्ध आहे. चोरांनी बुधवारी मध्यरात्री प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून दोन किलोंचा चांदीचा साज व दानपेटी फोडून सुमारे २० हजारांची रोख लंपास केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देदोन किलो चांदींचा साज, दानपेटीतील २५ हजारांची रोख लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नवसाला पावणारे वायगावचे गणपती विभागात प्रसिद्ध आहे. तेथील मंदिराला चोरांनी बुधवारी मध्यरात्री लक्ष्य केले. प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून गणपती मूर्तीच्या बाजूचा दोन किलोंचा चांदीचा साज व दानपेटी फोडून सुमारे २० हजारांची रोख लंपास केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.वायगाव येथील श्रीक्षेत्र गणपतीचे मंदिर राज्यभरात सुप्रसिद्ध आहे. मंदिराच्या छत सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. मजुरांचा वावर आहे. बुधवारी सायंकाळी कामावरील मजूर निघून गेल्यानंतर रात्रीच्या विधीवत आरतीनंतर पुजाऱ्यांनी मंदिर बंद केले. मंदिराच्या मुख्यद्वारासह दुसऱ्या बाजूला असलेल्या लोखंडी चॅनेल गेटलाही पुजाºयांनी कुलूप लावले. गुरुवारी सकाळी पुजारी शंभुनाथ पांडे व वैभव महाराज इंगोले यांनी मंदिरात प्रवेश केला असता, त्यांना चॅनेल गेटचे कुलूप तुटलेले दिसले. दानपेटीचे कुलूप तोडून रोख लंपास केल्याचे आढळून आले. पुजाºयांनी या घटनेची माहिती तत्काळ श्री सिद्धी विनायक गणपती संस्थाचे अध्यक्ष विलास इंगोले यांना दिली. त्यांनी वलगाव पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, वलगावचे ठाणेदार पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचले.पोलिसांनी पंचनामा केला असता, मंदिराच्या गाभाºयातील दोन किलो वजनाचा चांदीचा पत्रा व दानपेटीतील सुमारे २५ हजार रुपये लंपास केल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी पोलीस उपायुक्त व सहायक पोलीस आयुक्तांनी भेट देऊन पोलीस निरीक्षकांना चौकशीचे आदेश दिले. या घटनेच्या अनुषंगाने श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनीही पाचारण केले गेले. पोलिसांनी संस्थानचे अध्यक्ष विलास इंगोले यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.

वायगावच्या गणपती मंदिराच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून चोरी करण्यात आली आहे. तेथे पीओपीचे काम सुरू आहे. तेथील कामगारांची चौकशी सुरू आहे.- रणजीत देसाई,सहायक पोलीस आयुक्त

मध्यवस्तीत मंदिरअडीच हजार लोकवस्तीच्या वायगावात मध्यवस्तीत हे पुरातन गणपती मंदिर आहे. या मंदिराच्या आजूबाजूला लोकवस्ती असल्यामुळे दिवसभर भक्तांची वर्दळ असते. याशिवाय विविध जिल्ह्यांतील भक्तांचे आवागमन सुरूच असते. अशा स्थितीत मंदिरात चोरी झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे बंदपीओपीचे काम सुरू असल्याने दोन दिवसांपूर्वी कामाच्या गरजेनुसार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले. त्यामुळे ही चोरीची घटना कॅमेऱ्यात कैद होऊ शकली नाही.

कामगारांची चौकशीया चोरी प्रकरणात संशयाची सुई कामगारांवर आहे. पोलिसांनी काही कामगारांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

सिद्धीविनायक मंदिरात २८ किलो वजनाचे सिंहासन रिपिटने फिट केले होते. त्यातील २ किलोंचा पत्रा कापून नेला. दान पेटीतील अंदाडे २५ हजार रुपये नेले. कळस आणि काही मौल्यवान वस्तू रोज पुजारी काढून ठेवत होते. त्यामुळे कळस वाचले.- विलास इंगोले,अध्यक्ष सिद्धीविनायक मंदिर संस्थान, वायगाव

टॅग्स :theftचोरी