शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातून २०० एटीएमधारकांचा चोरला डेटा, चंद्रपुरातील तीन आरोपींना ताब्यात घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 21:02 IST

अमरावती : एटीएम क्लोनिंग प्रकरणातील आरोपींनी विदर्भातील तब्बल २०० खातेदारांचा एटीएम डेटा चोरल्याची माहिती पुढे आली आहे.

वैभव बाबरेकरअमरावती : एटीएम क्लोनिंग प्रकरणातील आरोपींनी विदर्भातील तब्बल २०० खातेदारांचा एटीएम डेटा चोरल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात अमरावती पोलिसांनी एकास, तर चंद्रपूर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. चंद्रपुरातील तीन आरोपींना अमरावती पोलीस प्रॉडक्शन वॉरन्टवर ताब्यात घेणार आहेत.बँक खात्यातून परस्पर पैसे चोरणाºया आंतरराष्ट्रीय टोळीतील चार आरोपींना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे. यातील हरीश बिस्वास, विशाल उमरे व आलोक नावाच्या आरोपीस चंद्रपूर पोलिसांनी, तर परितोष पोतदारला अमरावती पोलिसांनी दिल्लीवरून अटक केली. या चौघांची पोलीस कोठडीत चौकशी सुुरू आहे. परितोष पोतदार व विशाल उमरे हे दोघेही खातेदारांचा डेटा चोरण्यासाठी अमरावतीत आले होते. या दोघांनी अमरावतीमधील ५० ते ६० जणांचे एटीएम क्रमांक व पासवर्ड दिल्लीत बसलेला बॉस बिस्वासकडे पाठविले होते, तर विदर्भातील विविध शहरातील तब्बल २०० खातेदारांचा डेटा पाठविल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली आहे. देशभरात अशाप्रकारचे अनेक ठिकाण गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे घडल्याचे सांगण्यात येत आहे. या आरोपींकडे विदर्भ व मराठवाड्यातील बँक खातेदारांची माहिती चोरण्याचे काम होते. त्या अनुषंगाने त्यांनी हा डेटा चोरला. चंद्रपूर पोलिसांनी अटक केलेल्या तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्याचे प्रयत्न अमरावती पोलिसांनी चालविले आहे. मंगळवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रॉक्डक्शन वॉरंटसाठी न्यायालयात अर्ज सादर केला होता. त्यानुसार पोलीस चंद्रपुरातील आरोपींना ताब्यात घेऊन या प्रकरणाची पुढील चौकशी करणार आहे.ओडिशाला पोहोचले अमरावतीचे पथकएटीएम क्लोनिंग प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक झाली असून, यातील अन्य आरोपी ओडिशात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्या आरोपींना अटक करण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक ओडिशाला रवाना झाले होते. मंगळवारी सायंकाळी पोलीस ओडिशाला पोहोचले. त्यांनी आरोपींचे शोधकार्य सुरू केले होते.

टॅग्स :atmएटीएमAmravatiअमरावती