शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

गोदामातून बॅरिकेड्स चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:14 IST

------------------------------------------------------- सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह केबल लंपास अमरावती : सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह केबल, लोखंडी जाळी व साहित्य असा ११ हजारांचा मुद्देमाल चोरीला ...

-------------------------------------------------------

सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह केबल लंपास

अमरावती : सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह केबल, लोखंडी जाळी व साहित्य असा ११ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना नांदगावपेठ येथील एका हॉटेलमध्ये बुधवारी घडली. फिर्यादी राहुल मोहोड (४५, रा. बोरगाव धर्माळे) यांच्या तक्रारीवरून नांदगावपेठ पोेलिसांनी चाैघांविरुद्ध गुन्हा नोंदविला.

---------------------------------------------------

सिद्धार्थनगरात जुगार पकडला

अमरावती : गाडगेनगर पोलिसांनी सिद्धार्थनगरात कारवाई करून जुगाराच्या साहित्यासह १,०५० रुपयांचा मुद्देमाल गुरुवारी जप्त केला. आरोपी अशोक अर्जुनराव भुयार(५६, रा. भीमनगर), पुंडलिक बारकाजी मेश्राम (६५, रा. शेगाव) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

--------------------------------------------------

गवळीपुऱ्यात जुगार पकडला

अमरावती : नागपुरीगेट ठाण्यांतर्गत गवळीपुरा येथील ॲकेडमिक शाळेच्या प्रांगणात खुल्या जागेवर जुगार पकडून ९७० रुपयांचा मुद्देमाल गुरुवारी जप्त केला. नरेश मनिराम खोब्रागेड (४३, रा. पंचशीलनगर), श्रीकृष्ण गुलाबराव सोळंके (६०, रा. संतोषी नगर) विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

----------------------------------------

जळका शहापूर येथे जुगार पकडला

अमरावती : नांदगावपेठ पोलिसांनी येथील जळका शहापूर येथे गुरुवारी कारवाई करून जुगाराच्या साहित्यासह ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी सिद्धार्थ पांडुरंग तिखाडे (४२, रा. जळका शहापूर) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

----------------------------------------------------

अण्णाभाऊ साठेनगरात दारू पकडली

अमरावती : बडनेरा पोलिसांनी बडनेरा जुनी वस्तीतील अण्णाभाऊ साठेनगरात गुरुवारी कारवाई करून ७५० रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी आरोपी नीलेश तुकाराम वानखेेडे ( रा. बडनेरा) विरुद्ध गुन्हा नोंदविला.