शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माडू नदीत सापडलेल्या तरूणाचा आत्मघात नव्हे, तर मर्डरच! सहा महिन्यांनंतर खुनाचा गुन्हा दाखल

By प्रदीप भाकरे | Updated: June 6, 2023 14:13 IST

मुलीच्या कारणावरून मित्रांनीच काढला काटा

अमरावती : मोर्शी येथील माडू नदीच्या पात्रात मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाच्या मृत्यूचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्या तरूणाचा मृत्यू आकस्मिक नव्हे, तर त्याचा खून करण्यात आल्याचे सहा महिन्यानंतर स्पष्ट झाले आहे. राज उईके असे मृत तरुणाचे नाव आहे. 

याप्रकरणी, मृताचा मित्र परसराम वरकडे (२१, धुंडा बोरगाव, जि. बैतुल, मध्यप्रदेश) याच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी आरोपी रोशन टाकरखेडे (२२) व सिध्दू मुंद्रे (३०, दोन्ही रा. अंबाडा, ता. मोर्शी) यांच्याविरूध्द ५ जून रोजी रात्री १२ पुर्वी खून, खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला. १ जानेवारी रोजी रात्री ८ च्या सुमारास राज उईके याचा मृतदेह माडू नदीच्या पात्रात आढळून आला होता. आकस्मिक मृत्यूचा तपास व शवविच्छेदन अहवालाअंती त्याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

परसराम वरकडे याच्या तक्रारीनुसार, आरोपी रोशन व सिध्दू यांनी राज उईके व परसराम यांना नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी फिरायला जाऊ, अशी सुचना केली. त्यानुसार त्या दोघांनी १ जानेवारी रोजी राज व परसराम यांना मध्यप्रदेशातील आठनेर येथून कावला, किलबिरा, नळा या गावांच्या मार्गे मोर्शी येथील माळू नदीच्या पुलावर आणले. तेथे रात्री आठच्या सुमारास रोशन टाकरखेडे याने राज उईके याच्याशी मुलीच्या कारणावरून वाद घातला. त्याचवेळी रोशनने लोखंडी वस्तुने राज याच्या डोक्यावर वार केला. त्याला त्याच अवस्थेत पुलावरून माडू नदीच्या पात्रात ढकलून दिले. त्यामुळे तो मरण पावला. मित्राला धमकी व मारहाण

हा सर्व प्रकार परसरामच्या डोळयासमोर झाला. मात्र त्याला आरोपींनी घटनेची वाच्यता केल्यास, पोलिसांना सांगितल्यास तुला सुध्दा मारून टाकू, अशी धमकी दिली. त्याला देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे सहा महिने त्याने भीतीपोटी तोंड उघडले नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती