शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अखेर प्रतीक्षा संपली : अमरावती- मुंबई पहिले टेक ऑफ १६ एप्रिलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 11:49 IST

Amravati : मुंबई-अमरावती-मुंबई असा विमानसेवा करार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: बहुप्रतीक्षेनंतर अमरावतीविमानतळाहून १६ एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजता मुंबईकडे पहिले प्रवासी विमान झेपावणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणठीस यांच्या हस्ते नवनिर्मित विमानतळाचे लोकार्पण होणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यासह आमदार, खासदारांची उपस्थिती असणार आहे. त्या अनुषंगाने अलायन्स एअर लाइन्सकडून मुंबई-अमरावती-मुंबई विमानाच्या शुभारंभाचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.

अमरावती विमानतळाची नुकतीच एटीआर-७२ विमान चाचणी यशस्वी झाली. त्याकरिता इंदूर येथून विशेष विमान आले होते. त्यानंतर अमरावतीचे विमानतळ हे प्रवासी वाहतुकीसाठी सुसज्ज असल्याचे शिक्कामोर्तब झाले. सोमवारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि अलाइन्स एअर लाइनच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. यात अमरावती विमानतळाचे लोकार्पण आणि विमानसेवा सुरु करण्यासाठी विचारमंथन झाले. त्यानुसार, १६ एप्रिल रोजी शुभारंभाला पहिल्या विमानाने प्रवास करण्यासाठी काही जणांनी अलायन्स एअरलाइन्सच्या संकेतस्थळाहून बुकिंगसुद्धा केले आहे. मात्र अमरावती विमानतळाहून आठवड्यातून किती दिवस प्रवासी वाहतुकीच्या वेळापत्रकाबाबत संकेतस्थळावर अधिकृत माहिती टाकण्यात आली नाही. याविषयी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्या उपलब्ध झाल्या नाहीत. 

मुंबई-अमरावती-मुंबई असा विमानसेवा करारप्रादेशिक संपर्क योजना उडानअंतर्गत व्यावसायिक विमानसेवा अमरावती विमानतळाहून सुरू होत आहे. त्यानुसार आठवड्यातून तीन दिवस अमरावतीकरांना मुंबईने विमानवारी करता येईल, असे वेळापत्रक अलायन्स एअर लाइन्सने जारी केले आहे. अमरावती विमानतळावर अत्याधुनिक पायाभूत सुविधा, नेव्हिगेशन प्रणाली आणि ग्राउंड हैंडलिंगची चाचपणी चमूद्वारे झालेली आहे. अलाइन्स एअर लाइनच्या करारानुसार मुंबई-अमरावती-मुंबई अशी विमानसेवा असणार आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीAirportविमानतळ