शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तलाव हटविण्यासाठी सरपंच महिलेसह तिघींनी घेतले विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2022 08:00 IST

Amravati News गाव तलावाच्या आऊटलेटची दिशा बदलविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनात सरपंच महिलेसह तीन महिलांनी विषाचा घोट घेतला.

ठळक मुद्दे प्रकृती गंभीर, अमरावतीला हलविले

अनंत बोबडे

अमरावती : दर्यापूर तालुक्यातील लोतवाडा येथील गाव तलावाच्या आऊटलेटची दिशा बदलविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनात सरपंच महिलेसह तीन महिलांनी विषाचा घोट घेतला. त्या तिघींनाही अत्यवस्थ स्थितीत अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुरुवारी दुपारी लोतवाडा येथे आंदोलनस्थळी ही घटना घडली.

             दरवर्षी पावसाळ्यामध्ये लोतवाडा गावातील नागरिकांच्या घरात गाव तलावाचे पाणी शिरते, त्यामुळे अतोनात नुकसान होते. जीवितहानी टाळता येणार नाही, अशी स्थिती आहे. सबब, गाव तलावाला हटवून इतरत्र गाव तलाव निर्माण करावा किंवा या गाव तलावाच्या आऊटलेटची दिशा बदलावी, यासाठी गुरुवारी लोतवाडा येथील ग्रामस्थांपैकी सहाजणांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. पोलीस घटनास्थळी पोहोचताच तीन महिलांनी विष घेतले. तर उर्वरित तीन आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सरपंच पंचफुला कुऱ्हाडे, कोकिळा रक्षे, सुमित्रा रायबोले अशी विष घेणाऱ्या महिलांची नावे आहेत.

आश्वासनपूर्ती न झाल्याने आंदोलन

लोतवाडा येथे पाटबंधारे विभागाने दहा वर्षांपूर्वी गाव तलाव तयार केला. पाणी गावात शिरत असल्याने अनेक नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होते. जीवितहानी देखील नाकारता येत नाही. गतवर्षी तेथे भीमराव कुऱ्हाडे यांनी जलसमाधी आंदोलन केले होते. त्यावेळी पाटबंधारे विभागाने लेखी आश्वासन देत हा गाव तलाव हटविण्याबाबत पत्रव्यवहार देखील केला होता. मात्र, आश्वासनपूर्ती न झाल्याने कुऱ्हाडे यांच्या नेतृत्वात सरपंच पंचफुला कुऱ्हाडे, कोकिळा रक्षे, सुमित्रा रायबोले, राजू रक्षे, सुभाष रायबोले यांनी पाटबंधारे विभागाला २४ फेब्रुवारीपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, दखल न घेण्यात आल्याने गुरुवारी गाव तलावाजवळ आंदोलन करण्यात आले.

टॅग्स :agitationआंदोलन