शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

ठाणेदारांनीच दडपले रेट्याखेडा अंधश्रद्धा प्रकरण; ७७ वर्षीय वृद्धेला काळ फासत काढली होती धिंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 12:19 IST

Amravati : आमदारांनी दिली होती वृद्धेची धिंड निघाल्याची माहिती, सुन्न झाले गाव

नरेंद्र जावरे लोकमत न्यूज नेटवर्क चिखलदरा (अमरावती) : तालुक्यातील रेट्याखेडा येथील वृद्धेची धिंड काढण्याचा डोके सुन्न करणारा प्रकार मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी खुद्द ठाणेदाराला सांगून स्वतः चौकशी व तत्काळ कारवाईचे निर्देश दिले होते. परंतु, ठाणेदार व जमादाराने हा प्रकारच दडपण्याचा प्रयत्न केल्याचे पुढे आले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आता तक्रार पाठविण्यात आली आहे.

रेट्याखेडा येथे काळमी शेलूकर या ७७ वर्षीय आदिवासी वयोवृद्ध महिलेची गावातून तोंडाला काळे फासून धिंड काढली गेली. अमानवीय आणि निंदनीय अशा या घटनाक्रमाचा आँखो देखा हाल वृद्धेचा नातू आणि ग्रामपंचायत सदस्य सखाराम सुभेलाल शेलूकर यांनी भाजपचे विधानसभा प्रमुख शिवा काकड यांच्यामार्फत मेळघाट मतदारसंघाचे आमदार केवलराम काळे यांच्या पुढ्यात कथन केला व न्यायाची मागणी केली. आमदार काळे यांनी तत्काळ या घटनेची दखल घेत चिखलदराचे ठाणेदार आनंद पिदुरकर यांना फोनवर कळविले. जमादारालासुद्धा या घटनेची माहिती दिली. स्वतः घटनास्थळी जाण्याचे आणि निर्दोष असलेल्या एकाही आदिवासीला हात न लावता केवळ दोषींवर कारवाईचे निर्देश दिले. परंतु, ठाणेदार व जमादाराने पूर्णतः दुर्लक्ष केले. एकंदर हे प्रकरणच दडपण्याचा प्रयत्न ठाणेदार व जमादाराने केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता पोलिस पीडिताला वाचविण्यासाठी पाठविले की त्यावेळी आर्थिक व्यवहार झाला, याची चर्चा आता रंगली आहे. 

तो सहा दिवस झोपलाच नाही! 

  • पोलिस पाटील तथा तोच रोजगार सेवक असलेला बाबू जामूनकर गावात हुकूमशहासारखा वागत होता. त्यामुळे कोणीही त्याच्याविरुद्ध 'ब्र'ही काढायला तयार नाही. रेट्याखेडा येथे 'लोकमत'ने घटनास्थळाची संपूर्ण पाहणी केली. अनेकांशी चर्चा केली. आमदारांपर्यंत पोहोचलेला सखाराम शेलूकर तर सहा दिवस झोपलाच नाही
  • डोळ्यांपुढे सतत त्याच्या आजीचे काढलेले धिंडवडे, त्याचे दृश्य तरळत होते. यादरम्यान लोकांशी बोलताना त्याला शब्द सुचत नव्हते. त्याच्या डोळ्यांतून अश्रू सतत पाझरत होते. त्याने अखेर आ. काळे यांची भेट घेतली. आमदारांनी माझ्यासमोर ठाणेदाराला फोन लावून कारवाईचे निर्देश दिल्याचे 'लोकमत'शी बोलताना सखाराम शेलूकरने सांगितले. थंडबस्त्यात गेलेले हे प्रकरण उघडकीस आणून 'लोकमत'ने अन्यायाला वाचा फोडल्याचे तो बोलत होता.

"ठाणेदार आनंद पिदुरकर व जमादाराला तत्काळ घटनास्थळी जाऊन चौकशी व योग्य कारवाई करण्याचे आपण स्वतः आदेश दिले. लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच सगळा घटनाक्रम पुढे आला. परंतु, ठाणेदार, जमादार यांनी दुर्लक्ष केले. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तक्रार करण्यात आली आहे." - केवलराम काळे, आमदार, मेळघाट

"माझ्या आजीवर व माझ्या परिवारावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याच्या तंद्रीत सहा दिवस झोपच नाहीशी झाली. अखेर आमदार केवळराम काळे यांची भेट घेतली. तातडीने न्याय मिळेल, ही अपेक्षा होती. परंतु, प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न झाला." - सखाराम शेलूकर, ग्रामपंचायत सदस्य, रायपूर

"रेट्याखेडा येथील घटनेबाबात ५ जानेवारी रोजी आ. केवलराम काळे यांनी फोनवर माहिती दिली. तथापि, त्यामध्ये परिपूर्ण वर्णन नव्हते." - आनंद पिदुरकर, ठाणेदार, चिखलदरा

टॅग्स :AmravatiअमरावतीChikhaldaraचिखलदरा