शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाने दिले 'वडील' आणि 'काका' यांना प्रतिवादी करण्याचे निर्देश

By गणेश वासनिक | Updated: January 31, 2024 21:54 IST

मुलगी आणि वडिलांनी सोडला 'मन्नेरवारलू' जमातीचा दावा

अमरावती : औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध चैतन्या पालेकर यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका क्र. २५१९२/२०२३ दाखल केली. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्त्याचे वडील संजय पालेकर यांनी ' मन्नेरवारलू ' अनुसूचित जमातीचा दावा सोडून दिला, असे शपथपत्र दाखल केले आहे. हे शपथपत्र सर्वोच्च न्यायालयाने रेकॉर्डवर घेतले आणि याचिकाकर्त्याला 'वडील' आणि ‘काका' यांना प्रतिवादी म्हणून दोघांनाही आरोपी करण्याचे निर्देश दिलेत.

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती किनवट यांनी चैतन्या पालेकर यांचे 'मन्नेरवारलू' जमातीचे जातप्रमाणपत्र रद्द केले होते. या निर्णयाविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका दाखल केली होती. संविधानावरील पेटंट फसवणुकीचे ज्वलंत उदाहरण आहे, असे नमूद करीत उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली.

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, पुणे यांनी चैतन्या हिचे वडील संजय पालेकर आणि काका राजीव पालेकर यांचे 'मन्नेरवारलू' या अनुसूचित जमातीचे जातप्रमाणपत्र अवैध ठरवून रद्द व जप्त केले. तसेच तत्कालीन अपिलीय अधिकारी अपर आदिवासी आयुक्त नाशिक यांनी दोघांचेही अपिल फेटाळले होते. ही वस्तुस्थिती दोघांनीही दडपली होती आणि पुन्हा नव्याने या दोघांनीही अनुसूचित जमातीचे जातप्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र मिळविले होते. या दोघांच्या जातवैधतेच्या आधारावर आणखी तब्बल सात जणांनी जातवैधता प्रमाणपत्र मिळविले आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती यांनी संजय पालेकर यांना ३१ जानेवारी २००७ रोजी दिलेले ' जातवैधता ' प्रमाणपत्र रद्द केले आहे. तसेच याचिकाकर्ती चैतन्या यांनीही 'मन्नेरवारलू' जातीच्या फायद्याचा दावा करणार नाही, असे विधान सर्वोच्च न्यायालयात केले आहे.

याचिकाकर्तीने एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केला असून, इंटर्नशिपही पूर्ण केली आहे. हे न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे. याचिका प्रलंबित राहिल्यास याचिकाकर्त्याला कायद्यानुसार पदवी प्रमाणपत्र जारी करणे विद्यापीठासाठी खुले असेल, असेही सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहे. हे हल्ली प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.आदिवासी उमेदवाराच्या घटनात्मक हक्काची राखीव जागा बळकावून त्याला वैद्यकीय प्रवेशापासून वंचित करण्यात आले आहे. त्या शैक्षणिक सत्रातील राखीव जागेची भरपाई कशी करून देणार हा प्रश्न कायम आहे.- ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम महाराष्ट्र.