शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागात शिक्षक बदलीची लगीनघाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2022 05:00 IST

कोरोनामुळे दोन वर्षांपासून शिक्षकांची बदली प्रक्रिया रखडली होती. मात्र कोरोनाचे सावट कमी झाल्याने यंदा बदल्या करण्यासाठी शासनाने हिरवी झेंडी दिली आहे. शिवाय बदली पारदर्शी करण्यासाठी नव्याने  सॉफ्टवेअर विकसित केले आहे.  त्याची यशस्वी चाचणी झाली आहे.  त्यामुळे बदली प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नुकतीच बदली पोर्टलवर अवघड शाळांची यादी प्रसिद्ध झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकबदली प्रक्रियेस यंदा वेग आला आहे. जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा बदलीकरिता शासन स्तरावरून ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. सदर प्रणालीवर प्राथमिक शिक्षक बदली करता शासनाकडून संभाव्य वेळापत्रक जाहीर केल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली.कोरोनामुळे दोन वर्षांपासून शिक्षकांची बदली प्रक्रिया रखडली होती. मात्र कोरोनाचे सावट कमी झाल्याने यंदा बदल्या करण्यासाठी शासनाने हिरवी झेंडी दिली आहे. शिवाय बदली पारदर्शी करण्यासाठी नव्याने  सॉफ्टवेअर विकसित केले आहे.  त्याची यशस्वी चाचणी झाली आहे.  त्यामुळे बदली प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नुकतीच बदली पोर्टलवर अवघड शाळांची यादी प्रसिद्ध झाली. १३ ते २० जून बदली पोर्टल वर शिक्षकांनी माहिती अद्ययावत आणि सबमिट करणे, १४ ते २४ जून शिक्षकांनी शिक्षण अधिकाऱ्याकडे अपील सादर करणे, १४ ते २६ जून शिक्षण अधिकाऱ्यांनी  अपील तपासणे, १४ ते २८ जून शिक्षकांनी प्रोफाइल स्वीकारणे, गटशिक्षणाधिकारी सक्तीची स्वीकृती करणे २९  जून ते १ जुलै, शिक्षकांनी सार्वजनिक आक्षेप घेणे २४ जून ते ३ जुलै आणि ४ व ५ जुलै मुख्य कार्यकारी अधिकारी सार्वजनिक आक्षेपांची सुनावणी करणे, अशा प्रकारे बदलीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.  या वेळापत्रकानुसार शिक्षक बदल्यांची लगीनघाई  शिक्षण  विभागाकडून सुरू झाली आहे. 

गुरुजींना दिलासागेल्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यावर्षी शिक्षक बदल्यांचा मुहूर्त सापडल्याने बदलीपात्र शिक्षकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे. अवघड आणि दुर्गम क्षेत्रातील शिक्षकांनाही मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मेळघाटातील गावे अवघड क्षेत्रातजिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षक बदलीसाठी मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन्ही तालुक्यांतील सर्व गावे  यंदा अवघड क्षेत्र म्हणून शिक्षण विभागाने घोषित  केली  आहे.  त्यामुळे  बदली  पात्र असलेल्या गुरुजींना आता मेळघाटातून गैरआदिवासी भागात बदली मिळण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Teacherशिक्षकTransferबदली