शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Amravati | जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव; पुढील अडीच वर्षासाठी राहणार नियुक्ती

By जितेंद्र दखने | Updated: October 1, 2022 16:36 IST

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहीर

अमरावती : त्रिस्तरीय रचनेतील सर्वोच्च म्हणजेच जिल्हास्तरावर अस्तित्वात असणारी ग्रामीण प्रशासनातील प्रमुख संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत शुक्रवार ३० सप्टेंबर रोजी ग्रामविकास विभागाने काढली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांचे आगामी अडीच वर्षासाठीचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये अमरावती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे आता नवी चेहऱ्यांना अध्यक्ष पदाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

विविध जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगानं ग्रामविकास विभागाला मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता, ग्रामविकास विभागानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदांसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलं आहे. एकीकडे राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांची सुनावणी सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना दुसरीकडे ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाबाबत राजपत्र प्रसिद्ध करण्यात आल्यानं येत्या काही काळात निवडणूक जाहीर होणार का याकडे ग्रामीण भागातील मतदाराचं लक्ष लागले आहे.पाच महिलांनी सहावेळा भुषविले अध्यक्ष पद

जिल्हा परिषदेच्या १९६२ ते मार्च २०२२ पर्यतच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात ३१ अध्यक्ष जिल्हा परिषदेला मिळाले. यापैकी पाच महिलांनी सलग सहावेळा अध्यक्ष पदाचा मान मिळाला आहे. यात पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून सुमन शां सरोदे यांनी सन १९९४ ते ९५ पर्यत प्रभारी अध्यक्ष म्हणून कामकाज सांभाळले आहे. त्यानंतर १९९७-९८ मध्ये उषा बेठेकर,१९९९ ते २००० मध्ये विद्या वाटाणे, सन २००० ते २००२ पर्यत सुरेखा ठाकरे,२००५ ते २००७ पर्यत उषा उताणे आणि २०१२ ते २०१४ या कालावधीत सुरेखा ठाकरे आदीनी अध्यक्ष पद भुषविले आहे.या ठाकरे यांना दोनदा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.२००२ ते २०२० पर्यत अध्यक्ष पदाचे आरक्षण

२००२-सर्वसाधारण२००५- सर्वसाधारण महिला२००७-सर्वसाधारण२००९- सर्वसाधारण२०१२- सर्वसाधारण महिला२०१५-अनुसूचित जमाती२०१७- अनुसूचित जाती२०२० ना.मा.प्र.

टॅग्स :zpजिल्हा परिषदAmravatiअमरावती