शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी उधळला दरोड्याचा डाव, अध्या रात्री चोरांचे त्रिकूट जेरबंद

By प्रदीप भाकरे | Updated: October 18, 2023 14:09 IST

मिरचीपूड, चाकू व अन्य साहित्य घेऊन दरोडा टाकण्याच्या बेतात असलेल्या तिघांना शहर पोलिसांनी त्वरेने अटक केली.

अमरावती: मिरचीपूड, चाकू व अन्य साहित्य घेऊन दरोडा टाकण्याच्या बेतात असलेल्या तिघांना शहर पोलिसांनी त्वरेने अटक केली. नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हददीतील अशोक विहार परिसरात १८ ऑक्टोबर रोजी पहाटे २.१० च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून एक चायना चाकू, पेचकस 3) सुती दोरी, मिरची पूड, विना क्रमांकाची दुचाकी व दोन मोबाईल असा ८७ हजार १५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

सैयद तोसिफ सैयद आसिफ (२१), अहेमद बेग वल्द रशीद बेग (२३) व शेख जमील वल्द शेख मुस्ताक (२२, तिघेही रा. लालखडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांत पहाटे तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला. नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देशमुख लॉन तसेच शिवनेरी नगर भागात चो-या व घरफोडी होत असल्याने पोलीस आयुक्तांनी त्या भागात रात्रीची गस्त अधिक प्रभावी करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले व त्यांचे पथक मंगळवारी रात्री त्या भागात गस्त घालत होते.

दरम्यान, पथकाला पहाटे दोनच्या सुमारास पाच इसम घोळक्याने बसलेले दिसले. तसेच त्यांच्या बाजूला दोन गाडया दिसल्या. टिम चोरमले यांनी घेराव घालून त्या इसमांना पकडण्याचा प्रयत्न केला असता तनी आरोपींना पकडण्यात आले. तर, अन्य दोन आरोपी हे अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. ते दरोडा टाकण्याच्या उददेशाने शस्त्र बाळगून एकत्र मिळून आल्याने त्याचे विरुदध भादंविचे कलम ३९९, ४०२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.आरोपी रेकार्डवरील गुन्हेगार

तीनही आरोपी हे रेकॉर्डवरील असून, त्यांच्याविरुदध चोरीचे व इतर गुन्हे नोंद आहे. त्यांच्याकडून इतर गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेडडी यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट क्र. एकचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आसाराम चोरमले, सहायक पोलीस निरिक्षक मनीष वाकोडे, उपनिरिक्षक प्रकाश झोपाटे, हवालदार राजूआपा, फिरोज खान, सतीष देशमुख, दिनेश नांदे, विकास गुडदे, सुरज चव्हाण, निखिल गेडाम, निवृत्ती काकड, अमोल मनोहरे, चालक अमोल बाहदरपूरे, आकाश कांबळे, किशोर खेंगरे यांनी ही कारवाई केली.