शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
प्रशांतचा प्रेमसंबंधानंतर लग्नास नकार, 'मी आत्महत्या करेन' असे मेसेज करत संपवलं जीवन! नवीन खुलासा
3
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
4
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
5
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
6
मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही; मद्यपान करून कर्तव्य बजावणाऱ्या ७ जणांवर कारवाईचा बडगा
7
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
8
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
9
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
10
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
11
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
12
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
13
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
14
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
15
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
16
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
17
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
18
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
19
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
20
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण

अमरावतीत मॉडेल शाळांचा पायलट प्रोजेक्ट; जिल्हा परिषदेची संकल्पना, ४२ शाळांचा होणार कायापालट

By जितेंद्र दखने | Updated: December 14, 2022 19:24 IST

अमरावतीतील मॉडेल शाळांमध्ये पायलट प्रोजेक्टची संकल्पना राबवण्यात येणार आहे.  

अमरावती: जिल्हा परिषद अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील ३ शाळा आदर्श शाळा इंद्रधनुष्य शाळा म्हणून विकसीत करण्याचा मिनीमंत्रालयाचा संकल्प आहे.या योजनेतंर्गत १४ तालुक्यातील ३ शाळांमध्ये भौतिक, शैक्षणिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्याना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न झेडपीच्या शिक्षण विभागाचा आहे.मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

या उपक्रमामध्ये प्रत्येक शाळेतला स्मार्ट क्लास रूम,इतर भौतिक सुविधा तसेच अत्याधुनिक शैक्षणिक साहीत्य व विद्यार्थ्याच्या गुणवत्ता विकासाठी शिक्षकांना प्रशिक्षण आणि पायाभूत चाचण्याच्या माध्यमातून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती यांच्या व्दारे गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्याना दिले जाणार आहे.याशिवाय शैक्षणिक विकासही होईल हा या उपक्रमामागील उद्देश आहे. या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेसोबतच महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान तसेच आयसीआयसीआय फाउंडेशन व इतर सामाजिक संस्था तसेच लोकसहभागातून हा संकल्प पूर्णत्वास नेण्याचा जिल्हा परिषदेचा मानस आहे.या उपक्रमात १४ तालुक्यातील ४२ शाळांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या टप्यात १४ शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध असलेल्या प्रत्येक तालुक्यातील १ या प्रमाणे १४ शाळामध्ये हा उपक्रम प्राधान्याने राबविला जात आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्यात उर्वरित शाळांमध्येही या सुविधा पुरविल्या जाणार आहेत. पहिल्या टप्यातील शाळाभौतिक सुविधा असलेल्या शाळांमध्ये अमरावती तालुक्यातील माहूली जहॉगीर,अचलपूर मधील पथ्रोट कन्या शाळा,अंजनगाव सुजी तुरखेड,भातकुली कामनापूृर,चांदूर रेल्वे बग्गी,चांदूर बाजार घाटालाडकी उर्दू,चिखलदरा बोराळा, दर्यापूर शिंगणापूर,धामनगांव रेल्वे हिंगणगाव,धारणी खाऱ्या टेंभरू,मोर्शी नेरपिंगळाई मुले,नांदगाव खंडेश्र्वर मांजरी म्हसला,तिवसा गुरूदेव नगर,वरूड घोराड आदी १४ शाळांचा समावेश आहे. भौतिक सुविधा नसलेल्या शाळापुसदा,टाकळी जहागीर अमरावती,धामणी ,कांडली उर्दू अचलपूर,अंजनगाव सुजी कारला,हसनापूर पारडी,भातकुली जावरा कोलटेक,शिरजगांव कोरडे,सोनोरा बु चांदूर रेल्वे, देऊरवाडा, देवीनगर चांदूर बाजार, अंबापाटी, सत्ती चिखलदरा, रामतिर्थ, साईनगर गायवाडी दर्यापूर,धामनगांव रेल्वे जुना धामणगाव,तळणी रेल्वे धामनगांव रेल्वे, कुटूंगा, पाटीया धारणी, भाेईपूर,वाघोली मोर्शी,खंडाळा खुर्द,दाभा नांदगाव खंडेश्र्वर,धामंत्री,दापोरी खुर्द तिवसा, करजगाव गांधीनगर, लिंगा वरूड अशा २८ शाळांमध्ये भौतिक सुविधा नाहीत. जिल्हा परिषदेने यापूर्वी जिल्ह्यात बाला अंगणवाडी केंद्र मॉडेल म्हणून विकसित केले आहे. अतिशय कमी खर्चात अंगणवाडी मॉडेलचा प्रोजेक्ट यशस्वी झाला.त्यानंतर आता झेडपीच्या प्रत्येक तालुक्यातील आदर्श शाळा इंद्रधनुष्य शाळा म्हणून विकसित केल्या जाणार आहे. त्यासाठी नियोजन केले जात आहे. अशी माहिती अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली.  

टॅग्स :AmravatiअमरावतीSchoolशाळा