शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय जनजाती आयोगाला अध्यक्ष, उपाध्यक्ष नाहीत; आदिवासींनी न्याय मागायचा कुणाला?

By गणेश वासनिक | Updated: August 13, 2023 14:16 IST

ट्रायबल फोरमचा सवाल, दीड महिन्यापासून पद रिक्त, दिल्लीत आयोगाकडे तक्रारींच्या ढिग

अमरावती : आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्काचे संरक्षण व्हावे, त्यांचा सामाजिक, आर्थिक विकास व्हावा व तत्संबंधी राष्ट्रपतींना आदिवासी समाजाच्या विकासासंदर्भात दरवर्षी अहवाल सादर करणाऱ्या आणि घटनात्मक असलेल्या राष्ट्रीय जनजाती आयोगाला गत दीड महिन्यासून अध्यक्ष,उपाध्यक्ष नाहीत. त्यामुळे आदिवासी समाजाने न्याय मागायचा कोणाकडे? असा प्रश्न आदिमांच्या चळवळीत अग्रगण्य असलेल्या 'ट्रायबल फोरम' संघटनेचे राज्य सचिव तथा सेवानिवृत्त केंद्रीय सनदी अधिकारी एकनाथ भोये यांनी उपस्थित केला आहे.राष्ट्रीय जनजाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चौहाण यांनी २६ जून २०२३ रोजी कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आठ महिन्यांपूर्वीच अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३८ नुसार केंद्रात पुर्वी राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोग होता. सन २००३ मध्ये ८९ वी घटनादुरुस्ती होऊन त्यात नवीन अनुच्छेद ३३८(ए) समाविष्ट करण्यात आले. परिणामतः १९ फेब्रुवारी २००४ मध्ये राष्ट्रीय जनजाती आयोग निर्माण झाला. आता अनुसूचित जमातीसाठी केंद्रात स्वतंत्र आयोग आहे. राष्ट्रीय जनजाती आयोगात अध्यक्ष, उपाध्यक्ष व तीन सदस्य आहेत. या तीन सदस्यात एका महिला सदस्यांची नियुक्ती करणे अनिवार्य आहे. जुलै २०१९ मध्ये अनुसया उईके यांची छत्तीसगढ राज्यपालपदी नियुक्ती झाल्यामुळे उपाध्यक्ष पदही तेव्हापासून रिक्तच आहे. सध्या त्या मणिपूरच्या राज्यपाल आहेत.राष्ट्रीय जनजाती आयोगाला अध्यक्ष, उपाध्यक्ष नसणे ही बाब योग्य नाही. आदिवासींचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी आयोगाचे परिपूर्ण गठन करावे, यासंदर्भात केंद्रीय आदिवासी विकास मंत्री, सचिवांना पत्राद्वारे विनंती केले जाईल. आदिवासींवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.- नवनीत राणा, खासदार, अमरावती 

टॅग्स :Amravatiअमरावती