शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

यूबीआयमधील जम्बो फ्रॉडचा मास्टरमाईंड मॅनेजर नव्हे शिपाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2022 23:16 IST

बॅंकेच्या लॉकर्समध्ये असलेल्या २,३०० ग्रॅम खऱ्या सोन्यावर तेथील शिपाई पवन पारेकरची नजर गेली. त्याला त्यातून श्रीमंतीचा मार्ग गवसला. लॉकर्समधील ग्राहकांचे खरे सोने सुवर्णकारांकडे गहाण ठेवून त्याने ६० ते ७० लाख रुपये घेतले. अलीकडे हा गोरखधंदा उघड झाला अन् पारेकरची ‘पारी’ अकाली संपुष्टात आली. गोल्ड लोन फ्रॉड उघड होताच ग्राहकांचा विश्वास उडाला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘गोल्ड चोर बॅंक, युनियन बॅंक हाय हाय...’ असा फलक घेऊन एका ग्राहकाने शुक्रवारी राजापेठस्थित युनियन बॅंकेसमोर निषेध व्यक्त केला.  महिनाभरापूर्वी यूबीआयमध्ये सुमारे दोन कोटी रुपयांचा गोल्ड लोन फ्रॉड उघड झाला. शहरातील राष्ट्रीयीकृत बॅंकेतील हा पहिला फ्रॉड ठरला आहे. कोट्यवधी रुपयांच्या या अपहाराचा मास्टरमाईंड दुसरा तिसरा कुणी नव्हे, तर चतुर्थश्रेणी कर्मचारी निघाला आहे. बॅंकेच्या लॉकर्समध्ये असलेल्या २,३०० ग्रॅम खऱ्या सोन्यावर तेथील शिपाई पवन पारेकरची नजर गेली. त्याला त्यातून श्रीमंतीचा मार्ग गवसला. लॉकर्समधील ग्राहकांचे खरे सोने सुवर्णकारांकडे गहाण ठेवून त्याने ६० ते ७० लाख रुपये घेतले. अलीकडे हा गोरखधंदा उघड झाला अन् पारेकरची ‘पारी’ अकाली संपुष्टात आली. गोल्ड लोन फ्रॉड उघड होताच ग्राहकांचा विश्वास उडाला. तो आता निषेधापर्यंत पोहोचला आहे. शहरातील हजारो ग्राहक अपहाराच्या धास्तीने यूबीआयमधून ठेवी काढत आहेत.  

७२ लाखांचे बनावट प्रस्तावखरे सोने काढून त्याजागी बनावट सोने ठेवण्यात आले. आरोपी त्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी सुमारे ७२ लाख रुपये कर्जाचे २२ प्रस्ताव बनवले. त्यासाठी मागणी न केलेल्या मात्र बॅंकेच्या ग्राहक असलेल्या २२ खात्यांचा वापर करण्यात आला. त्यातही बनावट सोने दाखवून ७२ लाख रुपये गोल्ड लोन उकळण्यात आले. त्यामुळे शिपाई पारेकरव्यतिरिक्त या घोटाळ्यातील अन्य चेहरे उघड झाले आहेत.

असा घडला अपहार३७ ग्राहकांनी २,३०० ग्रॅम सोने गहाण ठेवून त्या किमतीच्या ७० टक्के रक्कम गोल्ड लोन म्हणून घेतली. पैकी लॉकर्समधील सुमारे १,५०० ते १,६०० ग्रॅम सोने पारेकरने वर्मा व सोनी या सुवर्णकारांकडे गहाण ठेवले. त्यातून ६० ते ७० लाख रुपये मिळवले. त्यात भोंडवेने मध्यस्थी केली. त्यापोटी त्यांनी तेवढ्याच वजनाचे बनावट सोने लॉकर्समध्ये ठेवले. एकूण २३०० ग्रॅम सोने तारण असताना पैकी काहींना पारेकरने सोने परत दिले. मात्र, ती रक्कम बॅंकेत भरलीच नाही. अनेकांनी पारेकरकडे पैसे दिले. त्या डिपॉझिटच्या नोंदी पारेकरने बॅंकेत घेतल्याच नाहीत. काही जण समोर आलेत, मात्र त्याने बॅंकेबाहेर सेटलमेंट केली.

हे गेले कारागृहातयाप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने यूबीआयच्या राजापेठ शाखेचा तत्कालीन व्यवस्थापक जतीन प्रेमचंद कुंद्रा, सहायक व्यवस्थापक गाैरव पुरूषोत्तम शिंदे, शिपाई पवन अरूण पारेकर व खासगी व्यक्ती सतीश भोंडवे यांना अटक केली. त्यांच्या जबाबावरून शेखर वर्मा व ओमप्रकाश सोनी या सुवर्णकारांना अटक करण्यात आली. त्या दोघांकडून ९८५ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. आता सहाही आरोपी मध्यवर्ती कारागृहातील कोठडीत आहेत. 

 

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजी