शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
4
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
5
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
6
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
7
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
8
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
9
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
10
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
11
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
12
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
13
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
14
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
15
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
16
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
17
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
18
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
19
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
20
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार

आता मोबाइलवर मेसेजने कळणार 'रेशन'ची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 19:12 IST

पुरवठा विभागाची सुविधा : रेशनकार्डधारकांचे ६० टक्के मोबाइल लिंक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रेशनकार्डधारकांचे धान्य दुकानात आल्यापासून त्यांना किती मिळाले, याचा एसएमएस संबंधित कार्डधारकासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मोबाइलवर मिळणार आहे. यासाठी रेशन दुकानदारांद्वारा संबंधितांचे मोबाइल क्रमांक फोर जी पॉश मशीनमध्ये लिंक करण्यात येत आहेत.

सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये पारदर्शी पद्धतीने रेशन धान्याचे वाटप व्हावे, यासाठी पुरवठा विभाग आग्रही आहे. यामध्ये वेळोवेळी अनेक बदल करण्यात आलेले आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळावे, यासाठी पुरवठा विभागाद्वारा रेशन कार्डधारकांचे मोबाइल क्रमांक मशीनमध्ये जोडण्यात येत आहे. सध्यादेखील ही प्रक्रिया सुरू आहे. या मोबाइल क्रमांकावर येणारे एसएमएस ऑटो जनरेटेड असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली.

जिल्ह्यात एकूण अंत्योदय व प्राधान्य गटात ४,९४,२१६ रेशनकार्डधारक आहेत व यामध्ये १९,६२,३४४ सदस्यसंख्या आहे. यापैकी सद्यःस्थितीत २,९२,१४८ रेशनकार्डधारकांनी मोबाइल जोडणीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. हे प्रमाण ५९.११ टक्के आहे.

पोर्टलद्वारे ऑटो जनरेटेड एसएमएस संबंधित रेशनकार्डधारकांना मिळत आहे. याद्वारे धान्याची उचल केल्याची माहिती, मिळालेल्या धान्याचा संदेश संबंधितांच्या मोबाइलवर प्राप्त होत आहे. सर्व रेशनकार्डधारकांनी मोबाइल क्रमांकाची जोडणी करण्याचे आवाहन सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रज्वल पाथरे यांनी केले आहे.

ठसा जुळत नाही, ओटीपीद्वारे धान्य बरेचदा संबंधित रेशनकार्डधारकाचा ठसा जुळत नाही, अशा वेळी जोडणी केलेल्या मोबाइलवर ओटीपी देण्यात येतो व त्याद्वारे ओळख पटवून त्यांना रेशनचे धान्य मिळते. ही सुविधा मोबाइल जोडणीमुळे उपलब्ध होते. शिवाय रेशन धान्याची उचल व वितरणाची माहिती मिळते. रेशनकार्डधारकाच्या कुटुंबातील मोबाइल जोडणी केलेल्या सर्व सदस्यांना ही सुविधा उपलब्ध असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली. 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाAmravatiअमरावती