शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

महागाईचा निर्देशांक वाढला; शिष्यवृत्ती उत्पन्नाची मर्यादा केव्हा वाढणार?

By गणेश वासनिक | Updated: January 29, 2023 16:12 IST

महागाईचा निर्देशांक वाढला असून शिष्यवृत्ती उत्पन्नाची मर्यादा केव्हा वाढणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

अमरावती: केंद्र सरकार व राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले पाहिजे, विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आला पाहिजे. म्हणून विविध शिष्यवृत्ती योजना राबविते. शिक्षणासाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ देते. परंतु पालकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ झाली नाही. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी शिष्यवृत्ती लाभांपासून वंचित राहतात. वर्षानुवर्षापासून शिष्यवृत्ती रक्कम व शिष्यवृत्ती उत्पन्नांची मर्यादा तीच आहे. शिष्यवृत्ती रक्कमही वाढवत नाही आणि उत्पन्न मर्यादेतही वाढ करीत नाही. याउलट महागाईचा निर्देशांक मात्र सातत्याने वाढत जातो. 

वह्या, रजिस्टर, स्टेशनरी साहित्य, पाठ्यपुस्तकांच्या किंमतीत वाढ झालेली आढळते. पण महागाई निर्देशांकानुसार शिष्यवृत्तीत व विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उत्पन्न मर्यादित वाढ झालेली दिसत नाही. भारत सरकार शिष्यवृत्ती योजना सन २००४ पासून सुरु असून ही योजना शालांत परीक्षोत्तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. शिष्यवृत्ती योजनेच्या उत्पन्नाची मर्यादा २ लाख ५० हजार रुपये आहेत. परदेशात विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी गेला पाहिजे म्हणून परदेश शिष्यवृत्ती योजना आहेत. ही योजना २००५ पासून सुरु आहेत. या शिष्यवृत्ती योजनेच्या उत्पन्नाची मर्यादा ६ लाख रुपये आहे.

शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क सन २०१२-१३ पासून आहे. या योजनेची उत्पन्न मर्यादा २ लाख ५० हजार रुपये आहे. व्यावसायिक पाठ्यक्रमात शिकणा-या आदिवासी विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता २००४ पासून दिल्या जातो. या योजनेची उत्पन्न मर्यादा २ लाख ५० हजार रुपये आहे. सरासरी गेल्या १५ ते १६ वर्षापासून शिष्यवृत्ती योजनांच्या उत्पन्नाची मर्यादा वाढविण्यात आलेली नाही. शिष्यवृत्ती व पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा मात्र वाढली नाही. आदिवासी विद्यार्थ्यांप्रमाणे अशीच अवस्था अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची आहेत.

शिष्यवृत्तीसाठी पालकांचे उत्पन्न मर्यादा वाढविण्यासाठी २३ सप्टेंबर २०२१ ला आदिवासी विकास मंत्री, सचिव आदिवासी विकास, आयुक्त आदिवासी विकास विभाग यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु अद्यापही पालकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ केलेली नाही. - दिनेश टेकाम जिल्हाध्यक्ष, ट्रायबल फोरम अमरावती. शिष्यवृत्ती योजनेच्या लाभासाठी उत्पन्नाची मर्यादा वाढविण्यात यावी, यासाठी अनेक पालकांची मागणी आहे. मात्र, हा निर्णय धोरणात्मक असून, राज्य शासनाने मंजूर केल्यानंतरच प्रशासन स्तरावर अंमलबजवाणी केली जाईल.- सुनील वारे, उपायुक्त, समाजिक न्याय विभाग अमरावती

 

टॅग्स :AmravatiअमरावतीInflationमहागाईScholarshipशिष्यवृत्ती